वरुण गांधींचा भाजप नेतृत्वावर निशाणा! म्हणाले, 'हिंदू-शिखांना आपसात लढवण्याचा प्रयत्न' - latur saptrang

Breaking

Sunday, October 10, 2021

वरुण गांधींचा भाजप नेतृत्वावर निशाणा! म्हणाले, 'हिंदू-शिखांना आपसात लढवण्याचा प्रयत्न'



 नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील पीलीभीतचे लोकसभेतील भाजपचे खासदार वरुण गांधी लखीमपूर खिरी प्रकरणावरून आपल्या पक्षाला घरचा अहेर दिला आहे. लखीमपूर खिरी हिंसाचारवरून हिंदू आणि शिखांना आपसात लढवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं वरुण गांधी म्हणाले.

    वरुण गांधी यासंबंधी एक ट्विट केलं आहे. लखीमपूर खिरी हिंसाचारावरून हिंदू आणि शिखांमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे फक्त अनैतिक आणि चुकीचेच नाही, तर दोष देणे आणि त्या जखमा पुन्हा चिघळवणं धोकादायक आहे. एका छोट्या राजकीय फायद्यासाठी देशाची एकता धाब्यावर ठेवू शकत नाही, असं म्हणत वरुण गांधींनी भाजप नेतृत्वार निशाणा साधला आहे.

वरुण गांधी यांनी यापूर्वी गुरुवारी ट्विटरवर वरून लखीमपूर खिरी घटनेची एक व्हिडिओ क्लिप शेअर केली होती. यात भाजप नेत्याच्या ताफ्यातील एसयूव्ही आंदोलक शेतकऱ्यांना चिरडताना दिसते आहे. 'व्हिडिओ अतिशय स्पष्ट आहे. आंदोलकांची हत्या करून त्यांना शांत केले जाऊ शकत नाही. निरपराध शेतकऱ्यांच्या हत्यांप्रकरणी दोषींना शिक्षा झाली पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात अहंकार आणि क्रौर्याचा संदेश जाण्यापूर्वी त्यांना न्याय दिला पाहिजे, असं वरुण गांधी म्हणाले होते.

यासोबतच वरुण गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून लखीमपूर हिंसाचार प्रकरणी ४ शेतकऱ्यांसह ८ जणांच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी केली होती. वरुण गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ट्विटरवरवरून आपले पत्र शेअर केले होते. लखीमपूर खिरी घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी पत्रातून केली होती आणि तसंच पीडितांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची भरपाई देण्याची शिफारस केली होती.



No comments:

Post a Comment