मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्स यांच्यावतीने वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने डिजिटल अभिवाचन स्पर्धा - latur saptrang

Breaking

Wednesday, October 6, 2021

मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्स यांच्यावतीने वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने डिजिटल अभिवाचन स्पर्धा

मुंबई, दि. 6 : मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने डिजिटल अभिवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी विषय – मराठी साहित्यातील ललित लेखन असा आहे.

नियम आणि अटी :-

  • मराठी साहित्यातील कोणत्याही ललित लेखाचं (कोणत्याही उताऱ्याचं) अभिवाचन स्पर्धक करू शकतात. लेख स्वलिखित किंवा प्रथितयश लेखकांचा असेल तरीही चालेल. ब्लॉग लेखनही चालेल.
  • ललित लेखाचा विषय कुठलाही चालेल. विषयाचं बंधन नाही.
  • व्हिडीओची वेळ – ३ ते ५ मिनिटं. (५ मिनिटांच्या वर नसावा).
  • स्पर्धकांनी व्हिडीओabhivachan.miti@gmail.com या इमेल वर गुगल ड्राईव्ह वरून पाठवावा.
  • ड्राईव्हवरून व्हिडीओ जात नसल्यासwetransfer.com किंवा transferxl.com या साईट्सवरून व्हिडीओ पाठवू शकता.
  • ही स्पर्धा ३ गटात होईल. स्पर्धेचे ३ गट –

– गट क्र. १ : वयोगट ५ ते १५

– गट क्र. २ : वयोगट १५ ते ३०

– गट  क्र. ३ : वयोगट ३० वर्ष आणि पुढे

  • व्हिडीओ पाठवताना संपूर्ण नाव,ठिकाण, फोन नंबर आणि स्पर्धेचा गट ही सर्व माहिती मेलमध्ये नमूद करावी.

(स्पर्धकांनी या माहितीशिवाय मेल पाठवले तर ते ग्राह्य धरले जाणार नाहीत)

  • व्हिडीओ करताना फोन आडवा धरावा. अभिवाचन सुरु करण्याआधी आपले नाव सांगावे आणि तुम्ही जे अभिवाचन करणार आहात त्या कलाकृतीचेही नाव सांगावे.
  • व्हिडीओ पाठवण्याची अंतिम तारीख – १० ऑक्टोबर
  • बक्षिसांचे स्वरूप रोख रक्कम,प्रशस्ती पत्रक आणि पुस्तकं असे असेल.
  • विजेत्या स्पर्धकांच्या अभिवाचनाचे व्हिडीओ कार्यक्रमात वापरले जातील आणि इतर काही निवडक स्पर्धकांच्या अभिवाचनाचे व्हिडीओ राज्य मराठी विकास संस्थेच्या फेसबुक पेजवर,मिती ग्रुपच्या फेसबुक पेजवर आणि युट्युब चॅनलवर, तसेच शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्यात येतील.

अधिक माहितीसाठी 9930115759 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

००००



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3DfwcGx
https://ift.tt/eA8V8J

No comments:

Post a Comment