राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून हिंदी संगीत रामायणाचे कौतुक - latur saptrang

Breaking

Sunday, October 10, 2021

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून हिंदी संगीत रामायणाचे कौतुक

मुंबई, दि. 10 : रामाचे गुणगान कितीही केले तरीही ते कमीच आहे, कारण त्यात नित्य नूतन असा आनंद आहे. राम सर्वांचा अंतर्यामी असल्यामुळे सर्वांच्या जवळच असतो. हिंदीतील संगीत रामायण मराठी गीत रामायणाप्रमाणेच अतिशय भावपूर्ण झाले असून त्याचे सादरीकरण उत्कृष्ट झाले, अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हिंदी संगीत रामायणाचे भरभरून कौतुक केले. यावेळी राज्यपालांनी संगीत रामायणच्या चमूला 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

प्रिया सावंत यांच्या पुढाकाराने राजभवन येथे शनिवारी (दि. 9) हिंदी संगीत रामायण संध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

सुनील सुधाकर देशपांडे यांनी हिंदी भाषेत लिहिलेल्या संगीत रामायणातील रचनांना ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वरबद्ध केले असून अनेक युवा गायक व गायिकांच्या मदतीने त्याचे सादरीकरण करण्यात आले. वेदश्री ओक व निनाद आजगावकर यांसह चमूने यावेळी रामायणातील सुश्राव्य रचना सदर केल्या. यावेळी व्यक्तिविकास व लीडरशिप ट्रेनिंग तज्ज्ञ प्रिया सावंत यांच्या ‘काव्यांजली’ या काव्यसंग्रहाचे देखील प्रकाशन करण्यात आले.

******

Governor applauds Hindi Sangeet Ramayana

Mumbai, 10: Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari has applauded the Hindi Sangeet Ramayana presented at Raj Bhavan Mumbai by various artists under the guidance of well known vocalist Vidushi Asha Khadilkar.

Stating that Lord Rama is eternal, the Governor said the boundless glory of Lord Rama reaches the masses through music. He praised the entire team of Hindi Sangeet Ramayana and announced a prize of Rs.१ lakh to the team. Vedashree Oak and Ninad Ajgaokar rendered the compositions of Ramayana on the occasion.

The programme Hindi Sangeet Ramayana was presented by Leadership Training Expert and motivational speaker Priya Sawant. The lyrics of Hindi Sangeet Ramayana have been written by Sunil Deshpande. The Governor released the book of poetry ‘Kavyanjali’ by Priya Sawant on the occasion.

 

*******



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/2WX3URK
https://ift.tt/3BvBBJ9

No comments:

Post a Comment