अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे लातूर जिल्हयात प्रचंड मोठे नुकसान अपद्ग्रस्तांच्या भावनेशी महाविकास आघाडी सरकार एकरूप - latur saptrang

Breaking

Friday, October 1, 2021

अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे लातूर जिल्हयात प्रचंड मोठे नुकसान अपद्ग्रस्तांच्या भावनेशी महाविकास आघाडी सरकार एकरूप







 एकही अपद्ग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल


 पालकमंत्री  ना. अमित विलासराव देशमुख

• नुकसानीचे ३-४ दिवसात पंचनामे पूर्ण करून शासनाकडे अहवाल सादर करावा
• विमा कंपन्यांनी, गावपातळीवर ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारावेत
• रस्ते आणि पुलाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे
• नगरपरिषदा आणि महापालिकेने हे रस्ते दुरुस्तीची मोहीम हाती घ्यावी
• आपत्तीमुळे खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करावा
• जलव्यवस्थपणासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा
• बंधारे, बॅरेजेस यांची तातडीने दुरुस्ती करून घ्यावी
लातूर प्रतिनिधी (शुक्रवार दि. १ आँक्टोबर २१)
    अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिमुळे लातूर जिल्ह्यात प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. या संदर्भाने अपद्ग्रस्तांच्या ज्या भावना आहेत त्याच्याशी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार एकरूप आहे, त्यामुळे एकही पात्र अपद्ग्रस्त शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल अशी ग्वाही लातूर येथे शासनाच्या वतीने पत्रकार परिषदेत राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री  ना. अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे.
  लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री  ना. अमित विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्ह्यात  अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची गुरूवारी जिल्हयातील अनेक ठिकाणी भेटी देऊन पहाणी केली, शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यांना धीर दिला  त्यानंतर, आज जिल्हाधिकारी  कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली.
 या बैठकीस आणि पत्रकार परिषदेस लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, आयुक्त मनपा अमन मित्तल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी, नगर पालिका नगरपंचायत अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ॲड. किरण जाधव, अभय साळुंखे, कल्याण पाटील, संतोष सोमवंशी, समद पटेल, सुनिता चाळक, लिंबन महाराज रेशमे आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते.
  या बैठकी नंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना पालकमंत्री ना. देशमुख यांनी सांगितले की, अतिवृष्टीचे हे संकट अभुतपुर्व आहे याची जाणीव राज्याचे महाविकास आघाडी सरकारला आहे. अपद्ग्रस्तांच्या ज्या भावना आहेत त्यांच्याशी सरकार एकरूप आहे. या अपद्ग्रस्तांना आधार देण्यासाठी सरका तत्परतेने पाऊले उचलीत आहे. आज लातूर येथे महसुल, कृषी, ग्रामविकास, जलसंपदा, बांधकाम, महावितरण या सर्व संबंधित विभागाच्या अधिकात्यांची बैठक घेऊन एकुण नुकसानीचा आणि मदत तसेच बचाव कार्याचा आढावा घेतला.
 अतिवृष्टी आणि पुरपरिस्थितीमूळे झालेल्या नुकसानीचे ३-४ दिवसात पंचनामे पूर्ण करून शासनाकडे अहवाल सादर करावा, पंचनामे करताना कोणतीही चूक होणार नाही याची दक्षता घ्यावी.  विमा कंपन्यांनी,  गावपातळीवर ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारावेत. एकही शेतकरी किंवा अपद्ग्रस्त मदतिपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, ज्यांच्या घरात पाणी घुसले होते, त्या कुटुंबांना  जीवनावश्यक वस्तूंचा तातडीने पुरवठा करावा. अतिवृष्टी आणि पुरामुळे खराब झालेल्या रस्ते आणि पुलाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे, अतिवृष्टीमुळे ,शहरातील रस्तेही खराब झाले आहेत, त्यामुळे नगरपरिषदा आणि महापालिकेने हे रस्ते दुरुस्तीची मोहीम हाती घ्यावी. आपत्तीमुळे खंडित झालेला वीजपुरवठा युद्धपातळीवर मोहीम राबवून पूर्ववत करावा, जलव्यवस्थपणासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा जेणेकरून नदीकाठी किंवा संगमाच्या ठिकाणी आणि होणारे भविष्यातील नुकसान टाळता येईल. बंधारे, बॅरेजेस यांची तातडीने दुरुस्ती करून घ्यावी कोणत्याही परिस्थितीत  पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी असे या निर्देश बैठकीदरम्यान दिले आहेत अशी माहिती ना. देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

No comments:

Post a Comment