दिशा प्रतिष्ठान लातूर ला सामाजिक कार्यासाठी राज्य स्तरीय पुरस्कार..महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे पुरस्कार वितरण.. - latur saptrang

Breaking

Friday, October 1, 2021

दिशा प्रतिष्ठान लातूर ला सामाजिक कार्यासाठी राज्य स्तरीय पुरस्कार..महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे पुरस्कार वितरण..


Happy T😊 Help हे ब्रीद वाक्य घेऊन मागील दीड वर्षाच्या काळात अतिशय आनंदाने प्रत्येक गरजूच्या उपयोगी पडण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिशाने आणि दिशा परिवाराच्या प्रत्येक सदस्याने केला आहे.. दिशाचे सर्व संचालक सर्वतोपरी या कामात आपलं योगदान देत आले आहेत याचा अनुभव लातूरकरांनी वेळोवेळी घेतला आहे..

त्यातच आपल्यावर कोरोनाच संकट आलं. दुसरी लाट तर खूप भयंकर होती, आपण सर्वांनी अनुभवली. सर्वच गोष्टींचा तुटवडा होता.. बेड मिळत नव्हते, रेमडिसिव्हीर मिळत नव्हत, ऑक्सिजन मिळत नव्हतं, रक्त मिळत नव्हतं अशा परिस्थितीत सर्वांना मिळत होती ती दिशाच्या संचालकांची मदत, आधार, धीर.. काळ कठीण होता, पण या कठीण काळातच आपण गरजूंच्या कामी आलं पाहिजे ही कर्तव्याची स्वयं-जाणीव दिशाच्या संचालकांनी लोकांच्या उपयोगी आणली..

या काळात काळाची गरज ओळखून दिशाने काही अशा गोष्टी केल्या ज्या देशात कदाचित कोणी केल्या नसतील. कल्पकता हा नाविन्यपूर्ण कामाचा आत्मा असतो. रुग्णांची, त्यांच्या नातेवाईकांची, वैद्यकीय सेवेतील लोकांची आवश्यकता ओळखून दिशाने काही गोष्टी केल्या. जसे की ते कडक उन्हाळ्याचे दिवस होते आणि कोविड सेंटर च्या बाहेर नातेवाईकांना आसरा नव्हता,सावली नव्हती. तर दिशाने अशा हॉस्पिटलच्या बाहेर त्यांच्यासाठी भागवत मंडप यांच्या साहाय्याने टेंट मारून निवाऱ्याची सोय केली. रुग्णांवर उपचार करत असलेल्या वैद्यकीय सेवेतील लोकांसाठी मध्यरात्री खाण्याची सोय करण्याची विनंती डॉ नितीन भराटे वाशी उस्मानाबाद यांनी केली तर दिशाने Mid Night Snacks रात्री 12.30 ते 1 वाजता तिथे जाऊन त्यांना जागेवर दिले. बेड, इंजेक्शन तर हजारच्या वर लोकांना मिळवून दिले. लाट ओसरल्यानंतर ही रुग्णांना घरी ऑक्सिजन सिलेंडर लागायचं.. ते ही मोफत देण्याचा उपक्रम दिशाने राबवला.

एवढंच करून दिशा थांबली नाही तर एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या संस्थेच्या मूळ उद्दिष्टाशी प्रतिबद्ध रहात कोरोना काळात जे कुटुंब अडचणीत आले त्यांच्या पाल्यांना/विद्यार्थ्यांना फिस साठी शैक्षणिक मदत ही दिशाने केली.. सरवस्ती लक्ष्मी पुढे हरली नाही पाहिजे असा निश्चयपूर्ण प्रयत्न दिशाने केला. अगदी विद्यार्थ्याला विदेशी शिक्षणासाठी सुद्धा मदत दिशाने केली.

रात्री बेरात्री गरज पडेल तस त्याही काळात दिशाचे संचालक स्वतः हॉस्पिटलमध्ये जात असत. धीर देत असत, अडचण दूर करत असत. अर्थात सर्व काळजी घेऊन. सुदैवाने आणि सत्कर्माच्या आशीर्वाद स्वरूप दिशाचा एकही संचालक कोरोनाग्रस्त झाला नाही.

कधी कधी तर असही झालं आहे की दिशाच्या संचालकांच्या घरची मंडळी कोरोना ग्रस्त होऊन रुग्णालयात दाखल असायची पण त्याही परिस्थितीत दिशाच्या संचालकांनी आपलं काम थांबवल नाही.. आपलं दुःख आपल्या काळजात दाबून हे उभे राहिले, अखंड काम करत राहिले. डोळ्यात पाणी असायचं पण फोनवरचे हात कधी थांबले नाहीत. मदतीची व्यवस्था करणं थांबले नाही. अनेकांचे प्राण वाचले, काही जणांचे नाही वाचू शकले. पण हे सुख दुःखाचे वारे अंगावर झेलत हा लोकसेवेचा प्रवास दिशा करतच राहिली. एक दिशा लोकसेवेची.

दिशाच्या याच कामाचा गौरव आज राज्य स्तरावर होतो आहे. महाराष्ट्रातून फक्त 10 संस्थांना पुरस्कृत करण्यात येणार आहे, त्यात लातूरची दिशा आहे.  हा गौरव जरी आमचा होत असला तरी आम्ही तो फक्त आमच्या संस्थेचा मानत नाही. याकामी आम्हाला सहकार्य करणाऱ्या, आमच्या हाकेला ओ देणाऱ्या वैद्यकीय सेवेतील, सामाजिक सेवेतील प्रत्येक व्यक्तीच्या वतीने आम्ही तो स्वीकारणार आहोत. खासकरून डॉक्टर्स, ज्यांनी नेहमी आम्हाला प्रतिसाद दिला.. सहसा नाही म्हंटल नाही. देवदूतच ते. लातूर मधील जेवढ्या ही व्यक्ती आणि संस्थांनी कोरोना काळात मानवीय कार्य केले आहे त्यांच्या सर्वांच्या वतीने हा पुरस्कार दिशा स्वीकारत आहे. या सर्वांचे आम्ही आभारी आहोत. असच आपण सर्वजण मिळून संकटकाळी समाजाच्या कामी येऊ.

No comments:

Post a Comment