उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या व्याख्यानाने होणार “राज्याचा अर्थसंकल्प : माझ्या मतदारसंघाच्या संदर्भात” कार्यशाळेचा समारोप - latur saptrang

Breaking

Tuesday, October 5, 2021

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या व्याख्यानाने होणार “राज्याचा अर्थसंकल्प : माझ्या मतदारसंघाच्या संदर्भात” कार्यशाळेचा समारोप

मुंबई, दि. 5 : महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स. पागे संसदीय -प्रशिक्षण केंद्रातर्फे विधिमंडळ सदस्यांसाठी विविध प्रबोधनात्मक आणि प्रशिक्षणात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. याच मालिकेत आयोजित करण्यात आलेल्या “राज्याचा अर्थसंकल्प : माझ्या मतदारसंघाच्या संदर्भात…” या संकल्पनेवर आधारित दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप बुधवार, दि. 6 ऑक्टोबर, 2021 रोजी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या व्याख्यानाने होणार आहे. मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे ही कार्यशाळा होत आहे.

अर्थसंकल्प आणि त्यातील आकडेवारी समजणे क्लिष्ट, गुंतागुंतीचे असते. अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेत सन्माननीय सदस्यांचा सहभाग वाढावा, अर्थसंकल्पातील तरतुदी आणि त्यांच्या मतदारसंघातील विकास योजना यांचा सुयोग्य मेळ साधता यावा, यासाठी कार्यशाळेची आखणी व विषयांची निवड करण्यात आली आहे.

बुधवार, दि. 6 ऑक्टोबर, 2021 रोजी या कार्यशाळेस वक्ते म्हणून उद्योग मंत्री सुभाष देसाई, संसदीय कार्यमंत्री अॅड.अनिल परब असणार आहेत. कार्यशाळेचा समारोप विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या व्याख्यानाने होणार आहे.

कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व सदस्यांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे मानद सल्लागार हेमंत टकले, महाराष्ट्र विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत आणि वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने यांनी केले आहे.

000



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3FjYbH7
https://ift.tt/eA8V8J

No comments:

Post a Comment