परळी वै...प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या आदेशावरून परळी नगरपालिकेवर बहुभाषिक नामफलकाचे अनावरण करण्यात आले. गेल्या अनेक वर्षापासून विविध भाषेतील नामफलक नगरपालिकेवर लावावेत अशी मागणी केली जात होती, या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री नामदार धनंजय मुंडे यांनी नगरपालिका प्रशासनाला आदेश देत सर्वभाषीय नामफलक नगर पालिकेच्या दर्शनी भागात लावण्यात आला.
सोमवार दि 27 सप्टेंबर रोजी न.प. गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांनी विशेष सर्वसाधारण सभा बोलावली या सभेमध्ये बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक असलेले प्रभू वैद्यनाथाचे ज्योतिर्लिंग आहे यामुळे देशभरातून विविध राज्यातून विविध भाषिक भाविक परळी शहरात येत असतात त्याच बरोबर परळी शहरातील अनेक धर्मीयांच्या मागणीनुसार परळी नगरपरिषद प्रशासकीय इमारतीसमोर विविध भाषांमध्ये नगर परिषदेच्या समोर नामफलक असावा अशी मागणी केल्या जात होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला सूचना केली होती. त्यानुसार आज नामफलकाचे अनावरण नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष शकील भाई कुरेशी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मुख्याधिकारी अरविंद मुंडे,बांधकाम सभापती शंकर आडेपवार,पाणीपुरवठा सभापती गोविंद मुंडे, शिक्षण सभापती गोपाळ आंधळे, नगरसेवक विजय भोयटे, चेतन सौंदळे,गोविंद कुकर,बालाजी मुंडे,केशव गायकवाड कार्यालयीन अधीक्षक संतोष रोडे स्वच्छता निरीक्षक शंकर साळवे,श्रावण घाटे आदी उपस्थित होते.हा बहुभाषिक नामफलक बसवल्या बद्दल विविध धर्मीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ना.धनंजय मुंडे, गटनेते वाल्मिक आण्णा कराड यांच्यासह नगरपरिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment