मुंबई,दि.1 : युवा लेखक व पत्रकार संदीप काळे लिखित ‘ऑल इज वेल : मनातला सक्सेस पासवर्ड’ या पुस्तकाचे तसेच पुस्तकाच्या हिंदी व इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन शुक्रवारी (दि. १) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाले.
यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवार, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, सकाळचे मुख्य संपादक श्रीराम पवार व लेखक संदीप काळे उपस्थित होते.
संदीप काळे यांच्या पुस्तकातून त्यांच्या आई वडिलांचा त्याग व तपस्या, तसेच त्यांचे प्रेम व परिश्रम दिसून येतात असे सांगून आई-वडील तसेच मातृभूमीला स्मरून समर्पण भावनेने कोणतेही कार्य केल्यास ते श्रेष्ठ ठरते असे राज्यपालांनी सांगितले. पुस्तकाच्या माध्यमातून युवा पिढी व लहान मुले प्रेरणा घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यपालांनी यावेळी संदीप काळे यांच्या आई वडिलांचा सत्कार केला.
काळे यांनी आपल्या लेखणीतून शोषितांचे व वंचितांचे दुःख मांडून सामान्य माणसाला नायक बनविले तसेच अनेक गोरगरिबांना मदत मिळवून दिली असे श्रीराम पवार यांनी सांगितले.
००००
Governor releases Sandip Kale’s book ‘All Is Well’
Mumbai Dated 1 : Governor Bhagat Singh Koshyari released the book ‘All Is Well: Manatla Success Password’ and its English and Hindi edition at Y B Chavan Auditorium, Mumbai. The book has been authored by journalist and writer Sandip Kale
Union Minister of State for Public Health and Family Welfare Dr Bharati Pawar, Member of Parliament from Hingoli Hemant Patil, Chief Editor of Sakal Shriram Pawar and author Sandip Kale were prominent among those present.
000
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3D8u8QT
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment