स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित खतवारी दरबार येथे सांस्कृतिक कार्यक्रम व सिंधी कवी संमेलन संपन्न - latur saptrang

Breaking

Friday, October 29, 2021

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित खतवारी दरबार येथे सांस्कृतिक कार्यक्रम व सिंधी कवी संमेलन संपन्न

मुंबई, दि. 29 : महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी तसेच विश्व सिंधी सेवा संगम आणि सिंधी सेवा संगम घाटकोपर यांच्या संयुक्त विद्यमाने भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित खतवारी दरबार, खार (प.) विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे तसेच सिंधी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन विश्व सिंधी सेवा संगमचे संस्थापक अध्यक्ष श्री गोपाल सजनानी यांनी केले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन विश्व सिंधी सेवा संगमचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजु मनवानी आणि श्रीमती लता अटवाणी हे होते. विश्व सिंधी सेवा संगमच्या महिला विंगच्या आंतरराष्ट्रीय उपाध्यक्षा गौरी छाबरीया यांनी निवेदन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रध्वजाच्या तिन रंगांचे फुगे मान्यवरांच्या हस्ते आकाशात सोडण्यात आले. त्यानंतर दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात सिंधी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाण्यांवर सादरीकरण केले. विश्व सिंधी सेवा संगम तर्फे गरजु अंध व्यक्तींना अन्नदान करण्यात आले.

या कवी सम्मेलनात श्री प्रदीप लालजानी (दुबई), श्रीमती बरखा खुशलानी (मुंबई), श्रीमती ऋतू भाटिया (गुजरात), डॉ गायत्री लालवानी (दाहोद), श्रीमती सुनीता मोहिनानी (अहमदाबाद), श्रीमती इंदिरा पुनावाला (पुणे) या कवी-कवयित्रींनी आपल्या कविता सादर केल्या.

महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीचे सहसंचालक सचिन निंबाळकर यांनी आभार व्यक्त केले.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/2XWtve6
https://ift.tt/eA8V8J

No comments:

Post a Comment