मुंबई, दि. 8 : कोरोनाच्या कठीण काळात डॉक्टर, नर्सेस, समाजसेवक, शासकीय अधिकारी, पोलीस, स्वच्छता कर्मचारी आदी सर्वांनी अंतःकरणपूर्वक प्रशंसनीय काम करून कोरोनावर मात केली. मात्र कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. यासाठी मास्क परिधान करणे, सुरक्षित अंतर ठेवणे आदी नियम सातत्याने पाळल्यास कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका राहणार नाही, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
अभिनेत्री दीपाली भोसले यांच्या दीपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारे ‘महाराष्ट्राचा कोविड योद्धा सन्मान’ राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. ८) राजभवन येथे प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
केईएम हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ हेमंत देशमुख, नायर हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ रमेश भारमल, कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ शैलेश मोहिते, मीरा भायंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांसह समाजातील विविध कोरोना योद्ध्यांना यावेळी राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
अभिनेत्री दीपाली भोसले सय्यद यांच्या पुढाकाराने सुरु करण्यात आलेल्या ‘डीबीएस महिला पथक’ या महिलांच्या बाऊंसरच्या पथक निर्मितीची घोषणा राज्यपालांच्या उपस्थितीत करण्यात आली.
०००
Deans of top Municipal Hospital felicitated by Governor Women Bouncers’ Force launched
Mumbai Dated 8 : The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari felicitated the deans of KEM, Sion and Cooper Hospitals at a felicitation of Corona Warriors held at Raj Bhavan, Mumbai on Friday (8th Oct). The felicitation was organized by the Dipali Bhosle Sayyad (DBS) Charitable Trust.
A Women’s Vigilance Force comprising women bouncers was also unveiled in presence of the Governor. The Squad has been created by the DBS Charitable Trust. Founder of the Trust, film star Dipali Bhosle Sayyad was also present on the occasion.
Dean of KEM Dr Hemant Deshmukh, Dean of Nair Hospital Dr Ramesh Bharmal, Dean of Cooper Hospital Dr Shailesh Mohite and Commissioner of Mira Bhayandar Municipal Corporation Dilip Dhole were among the 40 Corona Warriors felicitated on the occasion.
000
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3iFeepa
https://ift.tt/3BrMr2K
No comments:
Post a Comment