प्रतिवर्षानुसार याही वर्षी आर्यसमाज मंदिर, गांधी चौक, लातूर येथे श्री. विष्णुजी भूतडा यांचे अध्यक्ष ते खाली बैठक होऊन ४९ व्या सामुदाईक दसरा महोत्सव समितीची स्थापना करण्यात येऊन सामुदाईक दसरा महोत्सव समितीच्या अध्यक्ष पदी श्री. ईश्वर बाहेती यांची सर्वानुमते बिनविरोध निवड जाहिर करण्यात आली. तर उपाध्यक्ष पदी विष्णुजी भूतडा, श्रीकांत रांजणकर, दगडूसाहेब पडीले, वैजनाथअप्पा लातूरे व बाबुअप्पा सोलापूरे यांच्या निवडी झाल्याचे जाहिर करण्यात आले. तर कार्याध्यक्ष पदी प्रकाश पाटील वांजरखेडकर व सरचिटणीस पदी व्यंकटेश हालींगे, संयोजक पदी महादेव खंडागळे, ओमप्रकाश गोपे, नितीन मोहनाळे, शंकरराव मोरे, राजेंद्र दिवे, डॉ. व्यंकटेश सिध्देश्वरे, बाळासाहेब रेड्डी, संजय जमदाडे, अॅड. गोपाळ बुरबुरे, महादेव कानगुले तर मिरवणूक समितीच्या प्रमुख पदी महाविर काळे, उमाकांत हुरदुडे, अभिषेक पंतगे, विरेंद्र पाटील, सोमनाथ वाघमारे, दिपक पडीले ईत्यादिंच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. तर कोषाध्यक्ष पदी दिलीप कानगुले यांची तर रमाकांत बुरबुरे यांची सहकोषाध्यक्ष पदी निवड जाहीर करण्यात आली. तर सहसंयोजक पदी कमलाकर डोके, हर्षवर्धन आकनगीरे, नुतन हणमंते, गोविंद कठारे, पांडूरंग क्षीरसागर, लक्ष्मण रांजणकर, स्वागत समिती प्रमुख पदी मा. श्री. जयप्रकाश दगडे,
ओमप्रकाश पाराशर, चंद्रभानु परांडेकर, धर्मवीर परांडेकर, भारत माळवदकर तर संघटक पदी बस्वराज पाटील, प्रा. अमोल मालशेट्टे, धनराज भिंगोरे, बस्वराज मोहनाळे, रमेश भूतडा, राजेश शहा, रमेश राजे, भागवत संपते, अजय गोजमगुंडे. संयोजक पदी संतोष सोमवंशी, धनंजय बेंबडे, दयानंद जडे, राजेंद्र बनारसे, राजाराम ठाकुर, शिवकांत ब्रिजवासी, संगमेश्वर पानगांवे, मिरवणूक समिती - योगेश झंजे, अशोक पावले, वैजनाथ हालींगे, अशोक पवार, सदाशिव भालकीकर, दयानंद भालकीकर, सुधिर मिरजकर इत्यांदीच्या निवडी झाल्याची घोषणा विष्णू भूतडा यांनी केली.
तर कोरोना संसर्गजन्य विषाणूचा प्रभाव रोखण्याच्या दृष्टीने मिरवणूक न काढता फक्त आर्य समाज मंदिर येथे एकत्र येऊन ध्वजारोहन करण्यात येऊन शस्त्र पुजन करून सर्वांना शुभ संदेश देऊन सोने, चांदीचे वाटप करून दसरा महोत्सव संपन्न करण्यात येणार आहे. तरी सर्व पदाधिकाऱ्यांनी वेळेवर हजर राहून कार्यक्रम यशस्वी करण्यात यावा असे वैजनाथअप्पा लातूरे, बाबुअप्पा सोलापूरे, विष्णू भूतडा, प्रकाश पाटील वांजरखेडकर, श्रीकांत रांजणकर, व्यंकटेश हालींगे, महादेव खंडागळे, उमाकांत हुरदुडे, अध्यक्ष ईश्वर बाहेती इत्यादींनी आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment