औरगाबाद-( प्रतिनिधी)
लातूर चे संसद रत्न मा. खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परषदेचा राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
विद्यचे व संस्कृती चे माहेरघर असलेल्या पुण्य नगरीत साहित्यिकाना व्यासपीठ मिळावे म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद ची स्थापना झाली असून परिषदेच्या वतीने शिक्षण, साहित्य, कला, प्रशासकिय सेवा,कृषी उद्योग,कायदा, आरोग्य अशा विविध क्षेत्रात यशस्वी व विधायक आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला व संस्था ना परिषदेच्या वतीने गौरविण्यात येत असते.
गेली अनेक वर्षे मा. खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी आपला व्यवसाय सांभाळून सामाजिक बांधिलकी जोपासून अनेक समाजहित कामे केले आहेत.सामाजिक उपक्रमाला त्यांनी प्रोत्सान दिले आहे.
सोळाव्या लोकसभेत उच्च शिक्षित खासदार म्हणून नुकतेच हाई रेंज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्यांची नोंद झाली असून त्यांना तसे प्रमाणपत्र मिळाले आहे.
त्यांनी अनेक विषयात उच्च पदवी घेतल्या घेतल्या असून त्यांचे अनेक पुस्तके प्रकाशित झाले आहेत. ते कवी,लेखक,पत्रकार, राजकारणी अशा विविध भूमिका पार पाडत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्यस्तरीय "जीवन गौरव" पुरस्कार देऊन दि.१० ऑक्टोबर २०२१ रोजी गोवा येथे शानदार कार्यक्रमात पुरस्कार दिला जाणार आहे.
त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
------+-----------+----------+---------+--------+------
Mp Sunil Gaikwad sir
No comments:
Post a Comment