आ रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते योगीराज डेअरीचा शुभारंभ - latur saptrang

Breaking

Saturday, October 16, 2021

आ रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते योगीराज डेअरीचा शुभारंभ



       रेणापूर तालुक्यातील मौजे दवणगाव येथे नव्याने सुरू झालेल्या योगीराज डेअरीचा शुभारंभ विजया दशमीच्या शुभमुहूर्तावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांच्या शुभ हस्ते झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार गोविंदांना केंद्रे होते.

        याप्रसंगी आ रमेशआप्पा कराड यांनी दूध व्यवसाय शेतकऱ्यांशी निगडित असून जिद्द, चिकाटी आणि मेहनतीने या व्यवसायात निश्चितपणे यश मिळते असे सांगून नव्याने सुरू झालेल्या योगीराज डेअरीला शुभेच्छा दिल्या.  याप्रसंगी भाजपा ओबीसी आघाडीचे मराठवाडा संपर्क प्रमुख डॉ बाबासाहेब घुले रेणापूर पंचायत समितीचे उपसभापती आनंत चव्हाण माजी सभापती अनिल भिसे भाजपाचे तालुकाध्यक्ष अँड दशरथ सरवदे स्टेट बँक भोकरंबा शाखेचे बालाजी बावलगे संतोष चव्हाण बालाजी राठोड नारायण नागरगोजे राजेश घोडके बालाजी इंगळे किशन शिरसागर नवनाथ माने यांच्यासह आणि त्यांची प्रमुख उपस्थिती होती योगीराज दूध डेरीचे रघुनाथ नागरगोजे आणि योगीराज नागरगोजे यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले कार्यक्रमास शेतकरी दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments:

Post a Comment