मुंबई, दि. 31 :- “ज्येष्ठ संगीतकार, प्रसिद्ध व्हायोलिनवादक प्रभाकर जोग यांच्या निधनानं भारतीय संगीतातील महान कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या व्हायोलिन वादनानं गानरसिकांना सहा दशकांहून अधिक काळ मनमुराद आनंद दिला. स्वर्गीय सुधीर फडके तथा बाबूजींच्या ‘गीतरामायणा’तील गाण्यांना त्यांच्या व्हायोलिनची समर्थ साथ लाभली होती. व्हायोलिनला गायला लावण्याची किमया लाभलेले ते जादूगार होते. त्यांचं निधन ही राज्याच्या संगीत, कलाक्षेत्राची मोठी हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.
००००००
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/2XZuVo7
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment