'महाराष्ट्र बंद फसला आहे, बंद करायला यांच्याकडे लोक नाहीत' - latur saptrang

Breaking

Monday, October 11, 2021

'महाराष्ट्र बंद फसला आहे, बंद करायला यांच्याकडे लोक नाहीत'


 

कोल्हापूर; 

लखीमपूरमध्ये मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना अंगावर गाडी घालून चिरडल्याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारने बंद पुकारला आहे. या बंदला राज्यभरातून प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, या बंद भारतीय जनता पक्षाने आक्षेप घेत बंदला विरोध केला आहे. महाराष्ट्र बंद फसल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. ते कोल्हापुरात बोलत होते. लखीमपूरमध्ये घटलेली घटना दुर्दैवी असून त्यावरून चौकशी होऊन कारवाई होऊ शकते, असे ते म्हणाले.

लखीमपूर घटनेचा भाजपशी तसेच उत्तर-प्रदेश आणि केंद्र सरकारशी काय संबंध आहे हे मला कळत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. आणि महाराष्ट्र बंदचा कॉल कळण्यापलीकडे असल्याचे त्यांनी नमूद केले. जो काही बंद आहे तो भितीने असल्याचा टोला त्यांनी लगावला.

नवी मुंबईत महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद

नवी मुंबईत महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मुंबई एपीएमसी बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. तर महापालिका परिवहन उपक्रमांची एनएमएमटी बस सेवा काही वेळेपुरती सकाळ सत्रात सुरू केली होती. मात्र बेस्टने बस बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर एनएमएमटी व्यवस्थापकांनी 75 मार्गावर धावणाऱ्या दोनशे बस 11 वाजता बंद केल्या. अनेक शाळांमध्ये 8 वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. शहरातील सर्व बाजार, दुकाने,हाॅटेल बंद ठेवण्यात आले आहेत.

महाराष्‍ट्रात शांततेत बंद : जयंत पाटील

लखीमपूर हिंसाचाराचा निषेध करत  मविआकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलीय. (Maharashtra Bandh) महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मी संपर्कात आहे. राज्यात शांततेत बंद आहे. (Maharashtra Bandh) आमच्या बंदला बदनाम करण्यासाठी कुणी जर कारस्थान केलं असेल तर ते दुपारपर्यंत आमच्याकडे माहिती येईल, असे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी आज सांगितले.

कर चुकवणार्‍यांची मोठी संख्या असताना राष्ट्रवादीच्‍या अनेक नेत्यांच्या मागे ईडी, सीबीआयचा ससेमिरा लागला आहे. राष्ट्रवादी नेत्यांच्याच मागे ईडी, सीबीआय का? असा सवाल करत हे सर्व कारस्थान राजकारणातून केलं जातं आहे, असेही जयंत पाटील म्‍हणाले.

केंद्र सरकारचं मुद्दामहून कारस्थान सुरू आहे : नाना पटोले

लखीमपूर घटनेतील आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र हे भाजपविरोधी राज्ये आहेत. या राज्यातचं अशी परिस्थिती निर्माण झालीय. दबावतंत्र आम्ही मान्य करणार माही, असं भाजपकडून आलेलं आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. बंदमध्ये सहभागी झाल्याबद्दल राज्‍यातील जनतेचे त्‍यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment