राज्य सांस्कृतिक पुरस्कार योजनेअंतर्गत निवड समितीची पुनर्रचना - latur saptrang

Breaking

Wednesday, October 6, 2021

राज्य सांस्कृतिक पुरस्कार योजनेअंतर्गत निवड समितीची पुनर्रचना

मुंबई, दि. 6 : राज्य सांस्कृतिक पुरस्कार योजनेअंतर्गत निवड समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे.

या समितीमध्ये सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख अध्यक्ष, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव हे सदस्य तर सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे सदस्य सचिव असणार आहेत. झेलम परांजपे, उस्ताद सिराज खान, संगीता टेकाडे, प्रियदर्शन जाधव, रामकृष्ण पाटील, दिगंबर नाईक, हिरालाल पेंटर, आझाद नाईकवडी, शकुंतला नगरकर, मंजुषा पाटील, अभिजीत पोहणकर आणि नंदेश उमप हे अशासकीय सदस्य या समितीमध्ये असणार आहेत.

या समितीचा कालावधी 4 ऑक्टोबर 2021 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार पुढील तीन वर्षे किंवा समितीची पुनर्रचना यापैकी जे अगोदर होईल तोपर्यंत असणार आहे.

००००



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3ldDZP0
https://ift.tt/3uJyt9W

No comments:

Post a Comment