लातूर :- शहरामध्ये कोविड-१९ लसीकरणाची गती वाढविण्यासाठी लातूर शहर महानगरपालिकेमार्फत सतत प्रयत्न करण्यात येत आहेत. या अंतर्गत नुकत्याच संपन्न झालेल्या गणेशोत्सव काळात विविध गणेश मंडळाच्या माध्यमातून कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते व त्यास नागरीकांनी भरपूर प्रतिसाद दिलेला होता.
दिनांक ०७ ते १५ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत नवरात्र महोत्सव साजरा करण्यात येत आहे. शहरामध्ये विविध भागात नवरात्र महोत्सव मंडळामार्फत घटस्थापना करण्यात येते. नवरात्र महोत्सव काळात देखील जास्तीत जास्त मंडळांचा सहभाग घेवून लसीकरण शिबिर आयोजित करण्यात येणार आहेत.
तरी शहरातील सर्व इच्छुक नवरात्र महोत्सव मंडळांना आवाहन करण्यात येते की, जे मंडळ त्यांच्या माध्यमातून कोविड १९ लसीकरण शिबीर आयोजित करु इच्छितात त्यांनी त्यांच्या भागातील मनपाचे क्षेत्रिय अधिकारी किंवा मनपा आरोग्य विभाग कार्यालय किंवा मनपा हेल्पलाईन क्रमांक ९१५८६ ३२३३३ येथे संपर्क करावा. असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येते.
No comments:
Post a Comment