लखीमपूरमध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले. शेतकरी सांगत असतानाही त्यांचा आवाज दाबला जात आहे. या क्रूर घटनेची जबाबदारी केंद्र सरकारला आणि उत्तर प्रदेश सरकारला टाळता येणार नाही. त्यामुळे याेगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.
यावेळी पवार यांनी केंद्र सरकार, सीमेवरील दहशतवाद आणि अन्य बाबींवर भाष्य केले. ते म्हणाले, जम्मूमध्ये सैनिकांवर हल्ले होत आहेत. नुकतेच काश्मीरमध्ये पाच जवान शहीद झालेले आहेत. काश्मीरमधील परिस्थिती हाताळण्यास केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. चीनसोबत १३ वेळा बैठका घेतल्या. त्यातील एकही अयशस्वी झाली नाही. सीमाप्रश्नी सर्वपक्षीयांबरोबर सरकारने चर्चा करत नाही. यावरुन सरकारची भूमिका स्पष्ट होते. सीमाप्रश्नी सर्वपक्षीयांचे मत जाणून घेणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
नुसती बघ्याची भूमिका लाजिरवाणी
लखीमपूर येथे शेतकऱ्यांना चिरडले. लखीमपूर येथील घटनेत केंद्र सरकारच्या मंत्र्याचा मुलगा होता हे शेतकरी सांगतात तरीही ते नाकारले जाते. शेतकऱ्यांची हत्या झाली. सत्ता असली तरीही शेतकऱ्यांसाठी भूमिका घेतली पाहिजे. बघ्याची भूमिका घेणे हे लाजिरवाणे आहे. या घटनेची जबाबदारी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना जबाबदारी टाळता येणार नाही. त्यांनी जबाबदारीतून मुक्त व्हावे. लखीमपूरप्रश्नी राज्यात बंद पुकारल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची तुलना मावळशी केली. त्यांनी मावळमध्ये काही घडले हे सांगितले.
मावळच्या घटनेला भाजपची चिथावणी
मावळामध्ये शेतकरी मृत्यूमुखी पडले त्याला सरकारी पक्षाचे कुठलेही नेते जबाबदार नव्हते. ती कारवाई पोलिसांची होती. माजी मुख्यमंत्र्यांनी लखीमपूर आणि मावळ अशी तुलना केली. मावळमधल्या लोकांना माहीत झालेय की या घटनेशी लोकप्रतिनिधींचा समावेश नव्हता. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांनी तेथे गोळीबार केला होता. त्यामुळे बराच अपप्रचार झाला. मावळामध्ये ९० हजार मतांनी राष्ट्रवादीचा आमदार झाला. जर नाराजी असती तर हे चित्र वेगळे असते. मावळातील परिस्थिती समजून घेतली तर त्यांच्या ज्ञानात भर पडेल, असा टाेलाही त्यांनी लगावला.
तपास यंत्रणांचा गैरवापर
केद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे. मुबंईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी यांनी काही आरोप केले. माझ्यासमोर हे आरोप केले. ते आरोप सार्वजनिकही केले. त्यानंतर त्या ते गायब झाले. अनिल देशमुखांनी आरोपांमुळे राजीनामा दिला. मात्र, परमबीर सिंग हे गायब झाले. देशमुख यांच्या घरावर चार पाच वेळा छापे टाकून काय मिळाले हेही सांगितले पाहिजे. ईडी. सीबीआय, एसीबीचा गैरवापर मोठ्या प्रमाणात होत आहे.
केंद्रीय यंत्रणांपेक्षा मुंबई पोलिस अधिक कार्यक्षम
केंद्रीय यंत्रणांपेक्षा मुंबई पोलिसांनी जास्त ड्रग्ज जप्त केले आहेत. केंद्रीय यंत्रणांपेक्षा मुंबई पोलिस अधिक कार्यक्षम आहेत. कोणालाही शंका येणार नाही, अशी त्यांची कामगिरी आहे.एनसीबी अधिकार्यांचे पंच म्हणून निवडलेले गोसावी हे भाजपचे कार्यकर्ते होते. यावरुन एनसीबी कोणासाठी काम करत आहे, हे स्पष्ट होत आहे. एनसीबीच्या कारवाईवर केंद्रीय मंत्री श्रेय घेतात, यावरुन या कारवाई संदर्भातील हेतू स्पष्ट होतो, असेही पवार म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो
मी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो. कारण त्यांना अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखच वाटतय. मी राज्याचा चारवेळा मुख्यमंत्री होतो. मात्र सत्ता गेल्यानंतर मला कधीच आपणच मुख्यमंत्री आहोत, हे लक्षात राहिले नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
No comments:
Post a Comment