परभणी :-
सोशल मीडियाचा वापर चांगला की वाईट यावर अनेक मत मतांतरे आहेत. परंतु त्याचा व्यवस्थित उपयोग केला तर त्याची परिणीती सकारात्मक होऊ शकते याचा प्रत्यय नुकताच बेपत्ता झालेल्या 14 वर्षीय मुलीला सोशल मीडियाच्या प्रभावी प्रथम शोध लागला आहे. घरातील वादामुळे ती निघून गेली होती वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन च्या ग्रुप मध्ये बेपत्ता असलेल्या मुलींच्या आई ने मदत मागितली. व तपशील दिला यानंतर मुलगी शोधून पोलिसांच्या मदतीने वडिलांपर्यंत पोहोचविण्यात या टीमला यश आले.
डब्ल्यू एम ओ चे नाशिक समन्वयक खडू अहेर यांनी परभणीचे गोविंद कदम यांना कॉल करून सगळी माहिती घेतली. त्या नंतर असे समजले की मुलगी कल्याण रेल्वे स्टेशनला आहे नंतर लगेच खंडू अहेर सरांनी मुंबई पोलीस आसारे अक्षय कदम यांच्याशी संपर्क साधून कल्याण रेल्वे स्टेशन वरील त्या मुलीचे फोटो पाठवले होते. परंतु तिचे लोकेशन कळेपर्यंत ती पुढे निघून जात होती. कल्याण ते औरंगाबाद या रेल्वेमधे ती बसल्याचे समजल्यानंर लगेच डब्ल्यू एम ओ सोशल मीडिया ग्रुप पुणे येथे ही बातमी कळली लगेच तेथील काही मित्रांनी पोलिसांच्या मदतीने शोधण्याचे काम केले ती सापडली नाही येथील रेल्वे टेशन चे सि सी टी व्ही तपासले असता मनमाड येथे माहिती मिळाल्यानंतर मनमाड येथे राहणारे मनोज कांगे यांनी लगेच रेल्वे स्टेशन ला जाऊन या संबंधित माहिती पोलिस स्टेशन ला दिली व मुलीचा शोध सुरू केला मनमाड येथे ती रात्री साडे अकरा वाजता मिळाली लगेच तिच्या घरच्यांना माहिती देऊन मुलीला पोलिसांच्या स्वाधीन देण्यात आले ती मुलगी सुखरूप तिच्या घरी पहोचली आहे.
No comments:
Post a Comment