अवैध धंद्यावाल्या कडून हप्ते वसुली करणारा तो बुलेट वाला पोलिस कर्मचारी कोण ?
लातूर एसपींच्या आदेशाला झुगारून अवैध धंदे जोमात सुरु असुन दोन कर्मचाऱ्यांना सोबत घेवुन ठाणेदारांनी मनमानी सुरू केली आहे.
जिल्ह्यातील मुरुड शहर हे गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्यांचे माहेरघर झाल्याचे दिसून येत आहे. मटका, जुगार, अवैध रित्या जनावरांच्या बाजारात हप्ते वसुली व दारू तस्करी आदी अवैध व्यवसायाला याठिकाणी चालना मिळालीं आहे. अवैध व्यवसायाच्या भरवशावरच आज अनेक जण धन बलाढ्य झालेले आहे. कमाईचे एकमेव ठिकाण असल्याने या शहरात अनेक ठाणेदार बदलून येण्यास इच्छुक असतात. परिणामी पोलिसांच्या मुक्त संमतीनेच शहरात दिवसेंदिवस अवैध धंदे वाढत चालले आहे. नियमित हप्ते खोरी आणि वसुलीतून येथील अनेक ठाणेदार गब्बर झालेले आहे. याला येथे नव्याने रुजू झालेले सहायक पोलिस निरीक्षक हे देखील अपवाद नाही...?
आपल्या दोन बुलेट वाल्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घेऊन मटका, जुगार, दारू तस्करी आधी अवैद्य चालना देत आहे. मात्र, कुणी लोकप्रतिनिधी किंवा सामाजिक कार्यकर्ते या समस्या बाबत तक्रार देण्यासाठी गेल्यास त्यांना अवैध धंदे बंद असल्याचा आव आणत आहे. विशेष म्हणजे, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे हे रुजू झाल्यानंतर त्यांनी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना ताकीद देत अवैध धंदे बंद करा असे फर्मान सोडले.
शहरात गब्बरगंड त्रिमूर्ती ची गुटखा तस्करी सुरूच ?
गेल्या अनेक वर्षापासून मुरुड शहरात गुटखा तस्करी करणारे त्रिमूर्ती आपले बस्तान मांडून मुरुड शहरात व आजूबाजूच्या परिसरात खुलेआम गुटखा तस्करी करीत आहे. आपल्या होलसेल किराणा दुकानाच्या आड त्यांनी आपला हा गोरखधंदा सुरु ठेवला आहे. कोरोना काळात गुटखाविक्रीवर बंदी असतांना देखील त्यांनी मुरुड व लगतच्या परिसरात अवैधविक्री सुरु ठेवली. पोलीस अधिका-यांना नियमित हप्ते पोहच होत असल्याने आजही शहरात अवैध गुटखा तस्करी सुरुच आहे.तर त्यांच्या विरोधात जर कुणी तक्रार केली तर तो बुलेट राजा लगेच गुटखा माफियांच्या दुकानात निरोप देण्यासाठी हजर होतो .
मुरुड शहरात नरसिंह चौक परिसरात ,दत्त नगर , तुकाई मंदिर परिसर, ठोंबरे नगर,पारूनगर, येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू आहे यावर पोलीस प्रशासनाची जाणुन बुजून डोळे झाक चालू असल्याचे महिला वर्गातुन बोलले जात आहे यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. शहरातील अवैध धंद्याबाबत अनेक तक्रारी देण्यात येतात. मात्र मुरुड पोलीस ठाण्यात अधिकार्यापेक्षा इतर दोन अधिका-यांच्या प्रभाव दिसुन येतो. त्यामुळे तक्रारी कोणाकडे करावी व ठाणेदार कोण हाच प्रश्न अणुत्तरीत आहे ...??
पोलीस अधिकाऱ्याचा प्रभाव शहरात पडला फिका कर्मचाऱ्यांच्या आशिर्वादाने अवैध धंदे जोमात ?
शहरातील अनेक परीसरात अवैध दारू, जुगार, मटका या अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला आहे.हे अवैध धंदे खुलेआम सुरू असूनही पोलीस प्रशासनाचे हाताची घडी अन् तोंडावर बोट आहे. अवैध धंदे स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांच्या आशिर्वादाने मोठ्या प्रमाणात सुरु असुन पोलीस कर्मचारी हप्ते घेत असल्याचीही खमंग चर्चा शहरात आहे.
शहरात काही महिन्यांपासून अवैध धंद्यांचा मोठा सुळसुळाट सुरु आहे. शहरात अवैध दारू विक्री राजरोसपणे सुरु आहे शहरात लातूर रोडवर एका मोठ्या हाॅटेल मध्ये खुलेआम दारु विक्री चालू आहे तसेच खुलेआम मटका आणि जुगार स्थानिक ठाणेदारांच्या आशिर्वादाने सुरुच असल्याचे चित्र आहे. पोलिस ठाण्यातीलच काही कर्मचाऱ्यांचे या अवैध धंदेवाल्यांशी आर्थिक हितसंबंध असल्याची धडक चर्चा आहे. अवैध धंदे रोखण्याची स्थानिक पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही मानसिकता दिसून येत नाही. ते कानाडोळा करीत असल्याने येथील मटका, जुगार, दारू खुलेआम विक्री सुरु झाल्याने हे अवैद्य धंदे शहरातील रस्त्यालगत खुलेआम दुकाने थाटून सुरु आहेत. मात्र कारवाई का करत नाही? हा प्रश्न शहवासीयांना व विशेषतः महिला वर्गात होत आहे कायमच सतावत आहे. या रस्त्यालगत अनेक दारुडे पडलेले आढळतात. मात्र काहीच कारवाई होत नाही. त्यामुळे स्थानिक शहरवासीयांकडुन पोलीस प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. अवैध धंदेवाल्यांमध्ये काही दिवसांसाठी दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता त्यांचा प्रभाव शहरात फिका पडल्याचे दिसते. यावर पोलीस अधिक्षकांनी शहरातील पोलीस कर्मचाऱ्यांचे अवैध धंदेवाल्यांशी असलेले लागेबांधे मोडीत काढून अवैध धंदेवाल्यांवर वचक निर्माण करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. मात्र वरीष्ठ अधिकारी याकडे लक्ष देऊन शहर अवैध धंद्यापासुन मुक्त करून पोलीसांवर कारवाई करणार का हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.
No comments:
Post a Comment