मुंबई दि.१९ : दिवंगत प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना १०४ व्या जयंती दिनानिमित्त राजभवन येथे आदरांजली अर्पण करण्यात आली तसेच सामूहिक राष्ट्रीय एकात्मता शपथ घेण्यात आली. दरवर्षी १९ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली तसेच राजभवनातील कर्मचारी व अधिकारी यांसह राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली.
देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी व दृढ करण्यासाठी निष्ठापूर्वक काम करीन, तसेच सर्व धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद शांततामय आणि सांविधानिक मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न चालू ठेवीन, अशी शपथ यावेळी सर्वांनी घेतली. यावेळी राज्यपालांच्या उपसचिव प्राची जांभेकर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Raj Bhavan staff given National Integration Pledge on Indira Gandhi birth Anniversary
Mumbai, dt १९ : The १०४th birth anniversary of former Prime Minister of India late Indira Gandhi was observed as National Integration Day at Raj Bhavan on Friday (१९th Nov).
Principal Secretary to the Governor Santosh Kumar offered floral tributes to the portrait of Indira Gandhi and later read out the ‘National Integration Pledge’ to the staff and officers of Raj Bhavan.
Officers and staff expressed the resolve ‘to preserve and strengthen the freedom and integrity of the nation and to continue to endeavor towards settlement of all differences and disputes relating to religion, language, region or other political or economic grievances by peaceful and constitutional means’. Deputy Secretary to Governor Prachi Jambhekar, officers and staff were present.
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3qOZVDv
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment