महाराष्ट्र राज्य ऊर्जा मंत्रालयाचा केदार खमितकर यांना चवथ्यांदा पुरस्कार प्रदान - latur saptrang

Breaking

Saturday, November 27, 2021

महाराष्ट्र राज्य ऊर्जा मंत्रालयाचा केदार खमितकर यांना चवथ्यांदा पुरस्कार प्रदान




 ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र राज्य सरकार चा 15 वा ऊर्जा संवर्धन आणि व्यवस्थापन पुरस्कार पोस्टाद्वारे करण्यात आले. विद्यमान परिस्थितीत कोविड च्या प्रादुर्भावामुळे दरवर्षी प्रमाणे या वर्षी 15 वा ऊर्जा संवर्धन आणि व्यवस्थापन पुरस्कार सोहळा आयोजित होऊ शकला नाही म्हणून सर्व पुरस्कार विजेत्यांना घरपोच मोमेंटो आणि सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले. वैयक्तिक सेक्टर मध्ये पारितोषिक केदार खमितकर यांना वर्ष २०१९-२० करिता निवड करून पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे. मा. डॉ नितीन काशिनाथ राऊत मंत्री- नवीन व अक्षय ऊर्जा  आणि मा. प्राजक्त प्रसादराव तनपुरे- राज्य मंत्री नवीन व अक्षय ऊर्जा, महाराष्ट्र शासन यांच्या सोबत महाऊर्जा चे महासंचालक श्री. सुभाष एस् डुंबरे आयएएस यांच्या  स्वाक्षरी चे सन्मान पत्र - मोमेंटो विशेष पोस्टाद्वारे प्रदान करण्यात आले. राज्यात उद्योग, अभियांत्रिकी, रसायने, औषधी व अन्न, मेटल व स्टील,कागद निर्मिती,तेल व रसायने, वस्रोद्योग, थर्मल पॉवर, बांधकाम व्यवसाय, स्थापत्य, शासकीय इमारती व सर्वसाधारण क्षेत्रांमध्ये ऊर्जा संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्थांना व व्यक्तींना मागील १५ वर्षांपासून महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण तर्फे (महाराष्ट्र शासनाची संस्था) उर्जा सरंक्षण पुरस्कार देण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यात शाळा,महाविद्यालयात,शासकीय परिसरात लोक जागृतीसाठी ऊर्जा संरक्षण- राष्ट्र हिताचे राष्ट्रीय संपत्तीचे संरक्षण मोलाचे कार्य केदार खमितकर यांनी  केले आहे. राज्यस्तरीय निवडीबद्धल महाऊर्जा विभागीय कार्यालयात सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. लातूर विभागीय महाव्यवस्थापक डी.व्ही. कुलकर्णी व इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते. लातूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे उपाध्यक्ष आदिनाथ सांगवे, उदयोजक बळवंत रणदिवे, व्ही. डी. एफ. चे प्राचार्य मोहन बुके यांनी ऊर्जा ऑडिटर केदार खमितकर यांचे चवथ्यांदा महाराष्ट्र ऊर्जा मंत्रालयाचा पुरस्कार मिळाल्याबद्धल अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment