मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता कार्यभार नगरविकास मंत्री यांच्याकडे दिल्याचे वृत्त चुकीचे - latur saptrang

Breaking

Thursday, November 11, 2021

मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता कार्यभार नगरविकास मंत्री यांच्याकडे दिल्याचे वृत्त चुकीचे

मुंबई, दि. ११ :- मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता कार्यभार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे वृत्त सोशल मीडियावरून व्हायरल होत असून त्यात कुठलेही तथ्य नाही.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाकडून यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्यावर उद्या एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, त्यानंतर अवघे तीन ते चार दिवस आराम केल्यानंतर ते पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू होतील. आई जगदंबेचा कृपाशीर्वाद आणि तमाम जनतेच्या सदिच्छा उद्धव ठाकरे साहेबांसोबत आहेत.
त्यामुळे समाजमाध्यमावर फिरणाऱ्या खोट्या आणि खोडसाळ मेसेजेस आणि पोस्टवर विश्वास ठेवू नये, ही नम्र विनंती.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3DbjI3o
https://ift.tt/eA8V8J

No comments:

Post a Comment