गुरू नानकदेव यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन - latur saptrang

Breaking

Friday, November 19, 2021

गुरू नानकदेव यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

मुंबई, दि. 19 :- “शीख धर्मसंस्थापक, शीख बांधवांचे पहिले गुरू, गुरू नानकदेवजी यांनी जगाला एकता, समता, बंधुता, मानवतेचा संदेश दिला. समाजातून अस्पृश्यता, भेदाभेद नष्ट करण्याचा प्रयत्न केला. माता-भगिनींचा आदर, प्रत्येक व्यक्तीला सन्मानानं वागवण्याची शिकवण दिली.  ‘सेवा हाच धर्म’ हा विचार दिला. गुरु नानकदेव यांच्या विचारातंच अखिल मानवजातीचं, विश्वाचं कल्याण आहे. गुरु नानकदेवजी  यांनी दाखवलेल्या मार्गावरुन वाटचाल करणं, त्यांनी दिलेला विचार अंगिकारणं हेच त्यांना खरं अभिवादन ठरेल,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुनानकदेवजी यांचं स्मरण करुन त्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले आहे.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3qPZbxI
https://ift.tt/eA8V8J

No comments:

Post a Comment