मुंबई, दि. 27 – महाराष्ट्र शासन, राज्य मराठी विकास संस्था आणि मॅप एक कम्युनिकेशन्स प्रा. लि. पुणे याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंकनाद राज्यस्तरीय पाढे पाठांतर सात्मीकरण स्पर्धा पर्व-3 नावनोंदणी सुरु झाली आहे. महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना उत्तेजन देण्यासाठी, गणित विषयाची गोडी निर्माण होण्यासाठी राज्य शासनाच्या सहभागाने मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा. लि. आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या अंकनाद राज्यस्तरीय पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे हे तिसर पर्व आहे.
स्पर्धेच्या पहिल्या दोन पर्वांना विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय प्रतिसाद लाभला. पर्व 3 साठी नावनोंदणीस राज्यभर 8 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असून 15 डिसेंबर पर्यंत मुदत आहे. पाठ्यांचे व्हिडीओ 25 नोव्हेंबर पासून 31 डिसेंबरपर्यंत मिळालेल्या लिंकवर अपलोड करता येणार आहेत.
मराठी परंपरा संवर्धनाचा विषय असल्याने महाराष्ट्र राज्य शासनाने मराठी भाषा विभागाच्या राज्य मराठी विकास संस्थामार्फत सह-आयोजक या नात्याने या स्पर्धा आयोजनात सहभाग घेतला आहे. अंकनाद पाढे पाठांतर स्पर्धेतून मुलांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळते आणि अंकनादच्या संगीतमय पाढ्यांमुळे मुलांचे पाढे सहज ऐकून आत्मसात होतात. त्याचे परीक्षण होणे गरजेचे आहे. त्यासाठी अंकनाद तर्फे पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा ही संपूर्ण महाराष्ट्रात आयोजित केली जाते. जिल्हा पातळी, राज्य पातळीवर स्पर्धा घेतली जाईल. ही स्पर्धा मराठी भाषेतून घेतली जाईल. सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्यांना पाढे पाठांतर स्पर्धा खली राहील विद्यार्थी कोणत्याही माध्यमातून शिकत असला तरी स्पर्धा मराठी भाषेतूनच होईल. पाढे पाठांतर स्पर्धा महाराष्ट्रातील सर्वस्तरातील विद्यार्थ्यासाठी आहे.
स्पर्धेचे नियोजन:
जिल्हापातळीवर स्पर्धक आपल्या गटानुसार सांगितलेले पाढे म्हणतानाचा व्हिडीओ मिळालेल्या लिंक वर अपलोड करावा. परीक्षकांकडून त्याचे परीक्षण केले जाईल
राज्यपातळीवर:- परीक्षणानंतर गटनिहाय यशस्वी विद्यार्थ्यांना पायांवर आधारीत गणितीय आकडेमोड यावर आधारित प्रश्न विचारून तोंडी परीक्षण करण्यात येईल.
बक्षिसे:- व्हिडिओ अपलोड केलेल्या सर्व स्पर्धकांना प्रशस्तिपत्र दिले जाईल आणि राज्यपातळीवरील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र आणि प्रत्येक गटात 19 हजार, 7 हजार, 5 हजार अशी पहिल्या 3 क्रमांकांना भारतीय टपाल विभागाचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. ही स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यासाठी आणि सर्व सामान्य जनतेसाठी खुली आहे. त्यासाठी अंकनाद अॅपद्वारे फॉर्म भरून नोंदणी करु शकतील, अंकनाद अॅप गुगल प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे. स्पर्धेचे स्वरूप आणि नियम www.mahaaanknaad.com या वेबसाइटवर बघायला मिळतील, असे संचालक, राज्य मराठी विकास संस्था संजय कृष्णाजी पाटील यांनी कळविले आहे.
स्पर्धेचा अभ्यासक्रम
बालगट (बयोगट 4 ते 6) पहिली साठी अंक उच्चार 1 ते 100
दुसरी, तिसरी साठी 1 ते 10 पाढ़े, 11 से 20 पाढे, 21 ते 30 पाढे
चौथी पाचवी साठी पावकी, निमकी
सहावी, सातवी साठी पाऊणकी, सवायकी,
आठवी, नववी, दहावी साठी दिडकी, अडीचकी, औटकी आणि एकोत्रे
खुला गट आणि शासकीय कर्मचारी गटांसाठी पाऊणकी, सवायकी, दिडकी, अडीचकी, औटकी आणि एकोत्रे
०००
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3FRexGx
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment