साताराः सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मात्र, या मतदानादरम्यान तणाव पाहायला मिळाला. जावली तालुक्यातील उमेदवार शशिकांत शिंदे आणि ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची माहिती मिळत आहे.
तालुक्यातील उमेदवार शशिकांत शिंदे आणि ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मेढा येथे वाद झाला. मतदान केंद्रावर वाद झाल्यानं या ठिकाणी काही वेळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या ठिकाणी दोन्ही कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने तणाव कायम आहे. तसंच, पोलीसांचा फौज फाटाही घटनास्थळी दाखल झाला आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी आज मतदान
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. या मध्ये एकुण १० जागांसाठी मतदान झालं. या अगोदर ११ जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या यामध्ये खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार मकरंद पाटील तसंच रामराजे नाईक निंबाळकर हे काही प्रमुख नेते बिनविरोध निवडुन आले होते. मात्र नाराजांच्या बंडाळीमुळे या निवडणुकीत रंगत वाढली होती.
माजी मंत्री व आमदार शशिकांत शिंदे यांना विरोधाचा सामना करावा लागला. तर सहकार मंत्र्यानाच थेट आव्हान दिलं ते उदयसिंह उंडाळकर यांनी थेट सहकार मंत्र्यानाच आव्हान दिल्यामुळं सहकार मंत्र्यांना जीवाच रान करुन रणनिती आखावी लागली. तर राज्यगृहमंत्री शंभुराज देसाई यांना त्यांचेच विरोधक सत्यजितसिंह पाटणकर यांच आव्हान मिळाल्यामुळं शंभुराज देसाईंना या ठिकाणी अस्तित्वाची लढाई करण्यासाठी धडपड करावी लागतीये. एकुण १९६४ मतदार याठिकाणी मतदान करणार असून या निवडणुकीमध्ये आता नक्की कोण विजयी होणार, हे पाहणं औस्तुक्याचं ठरणार आहे.
No comments:
Post a Comment