मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा - latur saptrang

Breaking

Thursday, November 4, 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा

मुंबई, दि. ४ – दीपोत्सव, प्रकाश पर्व मंगलमय अशा दिवाळीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तेजोमय असा हा उत्सव आपल्या सर्वांच्या जीवनात आरोग्य आणि सुख, समृद्धी, संपन्नता घेऊन येवो अशी शुभकामनाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, दिवाळी सण सर्वांच्या आयुष्यात प्रकाश, तेज आणि चैतन्यदायी असे पर्व घेऊन येतो. हा उत्सव अंधाराला भेदून प्रकाशमान वाटा शोधण्याची प्रेरणा देतो. आपल्या सगळ्यांसमोर आरोग्याचे संकट उभे राहिले. या अंधाराला भेदून पुढे जाताना आपल्याला अस्वच्छता, प्रदूषण टाळण्याची आणि आरोग्यदायी सवयी, पर्यावरणाची काळजी घेण्याची प्रेरणा मिळाली आहे. या सकारात्मक गोष्टी आता आपल्याला आयुष्यभर जपाव्या लागतील. त्यांचा वसा पुढच्या पिढीला द्यावा लागेल. प्रकाशपर्वात प्रत्येक पणती तिमिराला भेदण्याची जबाबदारी घेते. त्याचप्रमाणे आपण सर्व कटिबद्ध होऊया. आरोग्यदायी गोष्टींसाठी पुढाकार घेऊया ज्यातून आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि संपन्नता येईल. त्यासाठी या तेजोमय, मंगलमय, प्रकाशपर्वाच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा!!



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3nQwjlY
https://ift.tt/eA8V8J

No comments:

Post a Comment