मुंबई, दि. 19 :- देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री, भारतरत्न दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी अभिवादन केले. दिवंगत इंदिराजींच्या जयंतीदिनी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त देशाचे स्वातंत्र्य, राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी निष्ठापूर्वक काम करण्याची शपथ घेत त्यांनी राज्यातील जनतेला राष्ट्रीय एकात्मता दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव विठ्ठल भास्कर, कक्ष अधिकारी सुनिल तुमराम, सहाय्यक कक्ष अधिकारी किरण देशपांडे, रूपेश वांगे यांनी दिवंगत इंदिराजींच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी सर्व उपस्थितांनी राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त देशाचे स्वातंत्र्य व राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी तसेच ती अधिक दृढ करण्यासाठी निष्ठापूर्वक काम करण्याची व आपापसातील सर्व धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद, तंटे किंवा इतर राजकीय, आर्थिक गाऱ्हाणी शांततामय व संविधानिक मार्गाने सोडवण्याचे प्रयत्न करण्याची शपथ घेतली.
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3ntuyMG
https://ift.tt/3DzcOFh
No comments:
Post a Comment