माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी ८ कोटी ५० लाख निधी वितरित करण्यास मान्यता – महिला व बाल विकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर - latur saptrang

Breaking

Wednesday, November 17, 2021

माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी ८ कोटी ५० लाख निधी वितरित करण्यास मान्यता – महिला व बाल विकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर

मुंबई, दि. 17- माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 8 कोटी 50 लाख निधी वितरणास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली.

मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे यासाठी माझी कन्या भाग्यश्री ही योजना लागू करण्यात आली आहे.

या संबंधीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून हा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

000

 

शासन निर्णय

202111171228004230


from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3npQTKZ
https://ift.tt/eA8V8J

No comments:

Post a Comment