माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन - latur saptrang

Breaking

Saturday, November 13, 2021

माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

मुंबई, दि.  13 : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, सहकारमहर्षी दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त  विधान भवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास माजी राज्यपाल डॉ. डी.वाय.पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव श्री.राजेन्द्र भागवत, सभापतींचे सचिव श्री.महेंद्र काज, अवर सचिव श्री.रविंद्र जगदाळे, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक आणि जनसंपर्क अधिकारी, म.वि.स. श्री.निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते श्री.यशवंत हाप्पे, डॉ.गजानन देसाई, ज्येष्ठ पत्रकार श्री.मधुकर भावे यांनी दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3kzc1wu
https://ift.tt/3kyoXmc

No comments:

Post a Comment