‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत उच्च न्यायालयात कायदेविषयक प्रदर्शन - latur saptrang

Breaking

Monday, November 8, 2021

‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत उच्च न्यायालयात कायदेविषयक प्रदर्शन

मुंबई, दि. 8 : मुंबई उच्च न्यायालय आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व उच्च न्यायालय विधी सेवा समिती, मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने ‘आझादी का अमृत महोत्सव’अंतर्गत, कायद्याचा इतिहास, कायदेविषयक माहिती, आणि प्राप्ती यासंबंधीचे प्रदर्शन दिनांक 8 नोव्हेंबर 2021 ते 14 नोव्हेंबर 2021 या कालावधीत कार्यालयीन वेळेत मुंबई उच्च न्यायालय म्युझियम रुम नंबर १७, तळ मजला मुख्य इमारत येथे आयोजित करण्यात आले. तरी त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य न्यायमूर्ती श्री. दिपंकर दत्ता यांच्या हस्ते दिनांक 8 नोव्हेंबर, 2021 रोजी करण्यात आले. कार्यक्रमाला उच्च न्यायालयाचे इतर न्यायमूर्ती व न्यायालयीन अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.

००००



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3mTguLT
https://ift.tt/eA8V8J

No comments:

Post a Comment