मुंबई, दि. 27 : प्रत्येक नागरिकाचे मतदार यादीत नाव असणे, हा त्याचा हक्क आहे. पण काही कारणास्तव आपले नाव मतदार यादीत नोंदविणे प्रलंबित राहिले असेल किंवा 18 वर्षे पूर्ण झालेल्या नव मतदारांचे नाव मतदार यादीत नसेल अशा सर्वांकरिता विशेष संक्षिप्त पुनरिक्षण शिबिरातून नोंदणी करावी, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजीव निवतकर यांनी केले.
संपूर्ण राज्यभर विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाद्वारे 18 वर्षे पूर्ण झालेल्या तसेच दिव्यांग व्यक्ती, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, तृतीयपंथी यांचे मतदार नोंदणीचे आयोजन करण्यात आले आहे. याकरिता काही संस्थाही स्वत: पुढाकार घेऊन यासाठी पुढे आल्या आहेत. मुंबईतील वरळी येथे नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंड (नॅब) या संस्थेच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या विशेष शिबिराला मुंबई जिल्हाधिकारी श्री.निवतकर यांनी भेट दिली.
यावेळी श्री.निवतकर म्हणाले की, कोणत्याही 18 वर्ष पूर्ण व्यक्तीचे नाव मतदार यादीत असावे याकरिता शनिवार आणि रविवार दिनांक 27 आणि 28 नोव्हेंबर 2021 रोजी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. यात तरूण, दिव्यांग, तृतीयपंथी, देह व्यवसाय करणाऱ्या महिला आदींनी आपले नाव दाखल करावे. निवडणूक मतदार यादी तयार झाल्यानंतर प्रत्येकाला निवडणूक फोटो कार्ड देण्यात येणार आहे. ज्या मतदारांना निवडणूक फोटो कार्ड मिळणार नाहीत, त्यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी निवडणूक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री.निवतकर यांनी केले.
000
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3xt7gJY
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment