मुरुड : आपण जेव्हा इलेक्ट्रीकच्या दुकानांमध्ये गेलो की कुठलीही वस्तू घेत असताना आयएसआय मार्क आहे का ? ते पाहूनच घेतो तसेच मुरूडमध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल तर दिलीप दादा नाडे यांचा "डीडीएन" मार्क लागतो आणि जो टिकला तो भरभराटीला येतो असं वक्तव्य लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी महाजन हॉस्पिटल आय. सी. यु सेंटरच्या
शुभारंभ प्रसंगी म्हणाले.
पुढे बोलताना आमदार धीरज देशमुख म्हणाले की, कोविड च्या काळात मुरुड ग्रामपंचायतीने खूप चांगले काम केले आहे. लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात रुग्णांची विशेष काळजी त्यांनी घेतले होते, माझ्या ग्रामीण मतदारसंघात मुरुड एकमेव अशी ग्रामपंचायत आहे की, स्वतः पुढाकार घेऊन रुग्णाच्या सेवेसाठी तत्परता दाखवली होती. मुरुड ग्रामपंचायतीची यंग ब्रिगेड टीम खूप चांगली असून त्यांचे काम उत्तम आहे. दिलीप दादा नाडे हे ऑलराऊंडर असून "उद्घाटन के पहिले भी और उद्घाटन के बाद भी" अशी त्यांची ख्याती आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब यांची डिग्री एल एल बी ची होते पण त्यांना वकिली करता आली नाही, मी लंडनला जाऊन एमबीएची पदवी घेऊन आलो ती पदवी आता सध्या फ्रेम मधेच आहे. आता मी आमदार आहे.
महाजन पाटील हॉस्पिटल विषयी बोलताना आमदार म्हणाले की, इथे आलेला रुग्ण बरा होऊन घरी जावा माझ्या मतदार संघात हे हॉस्पिटल उभे राहत आहे, याचा मला अभिमान आहे. आता येथील लोकांना लातूर, सोलापूर, औरंगाबाद, पुणे किंवा इतर शहरात उपचारासाठी जाण्याची गरज नाही तीन तालुक्याचा संपर्क मुरुडला आहे, येथील लोकसंख्या पंधरा हजाराच्या घरात आहे.
या हॉस्पिटलच्या शुभारंभ प्रसंगी माजी आमदार वैजनाथ शिंदे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप नाडे, विजय देशमुख, धनंजय देशमुख, बी.एस.पटाडे,लक्ष्मणराव देशमुख, आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment