अक्कलकुवा तालुक्यात वृक्ष लागवडीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करावी – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे - latur saptrang

Breaking

Wednesday, November 24, 2021

अक्कलकुवा तालुक्यात वृक्ष लागवडीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करावी – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. 24 : नंदुरबार येथील मौजे भगदरी, मौजे भांगरापाणी, मौजे काठी व जौजे मुलगी, शहादा या गावात रोजगार हमी योजनेअंतर्गत सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्ष लागवड करण्यात यावी. असे निर्देश मृद व जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

नंदुरबार येथील अक्कलकुवा तालुक्यातील वृक्ष लागवडीच्या कामांसंदर्भात बैठकीचे आयोजन आज मंत्रालयात करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. या बैठकीस माजी आमदार नरेंद्र पाडवी, नाशिकचे वनसंरक्षक अ.मो. अंजनकर, धुळे वनसंरक्षक डी. डब्लु. पगार, नंदुरबारचे उपवनसंरक्षक कृष्णा भवर, नंदुरबारचे सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनअधिकारी आर.ए.कुलकर्णी आदीसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्री भरणे म्हणाले, अक्कलकुवा तालुक्यातील संबंधीत गावात सामाजिक वनीकरण विभागामार्फत रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्ष लागवड करण्यात यावी. जेणेकरून जास्तीत जास्त रोजगार निर्मिती होईल. नियमानुसार काम करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहकार्य लाभेल या दृष्टीने काम करावे असेही ते म्हणाले.

०००



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3HSN09J
https://ift.tt/eA8V8J

No comments:

Post a Comment