मुंबई शहर मतदार नोंदणीसाठी शनिवार व रविवारी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन - latur saptrang

Breaking

Friday, November 26, 2021

मुंबई शहर मतदार नोंदणीसाठी शनिवार व रविवारी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन

मुंबई, दि.26 : भारत निवडणूक आयोगाने दिनांक ०१ नोव्हेंबर २०२१ ते दिनांक ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम ( Special Summary Revision Programme) जाहीर केला आहे. या कार्यक्रमांतर्गत सदर कालावधीत नवीन मतदारांची नोंदणी करणे / मतदारांचे नाव, पत्ता, फोटो यामध्ये दुरुस्ती करणे आणि मयत, दुबार व स्थलांतरित मतदारांची वगळणी इ. बाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग मतदार, महिला आणि समाजातील वंचित घटकांतील मतदारांची जास्तीत जास्त मतदार नोंदणी होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचबरोबर मतदारांची नावे समाविष्ट करण्यासाठी दि. २७ नोव्हेंबर, २०२१ व दि. २८ नोव्हेंबर, २०२१ रोजी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

            मुंबई जिल्ह्यातील नवमतदार दिव्यांग/अपंग व्यक्ती, देहविक्रय करणाऱ्या महिला तसेच वंचित घटकातील व्यक्ती किंवा ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत त्यांच्यासाठी  २७ व   २८ नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी ११.००  ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी मतदारांनी जवळच्या मतदार मध्यवर्ती नोंदणी कार्यालयास भेट देवून आपले नाव नोंदणी करावी.

 

0001

 

            मतदारांनी नाव नोंदणी करण्यासाठी जवळचे मध्यवर्ती मतदान केंद्र व पदनिर्देशित ठिकाणी भेट द्यावी मतदार केंद्रांची व पदनिर्देशित ठिकाणांची यादी electionmumbaicity.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच www.nvsp.in या संकेतस्थळावर जाऊन online पद्धतीने किंवा Voter Helpline App द्वारे मतदार यादीत आपले नाव नोंदणी करावे, असे आवाहन मुंबई शहरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी,  राजीव निवतकर  यांनी केले आहे.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3rahzS6
https://ift.tt/eA8V8J

No comments:

Post a Comment