मुंबई: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर खंडणीचे आरोप झाल्यामुळं वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या व सहा प्रकरणांच्या तपासातून दूर करण्यात आलेले एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आरोपाचा मारा सुरूच ठेवला आहे. मलिक यांनी आज वानखेडे यांच्यावर नव्यानं आरोप केला आहे. तर, दुसरीकडं वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) हिनं नांदेड व जळगावमध्ये एनसीबीनं केलेल्या कारवाईवरून सूचक व खोचक ट्वीट केलं आहे.
मुंबई एनसीबीच्या पथकानं जळगाव जिल्ह्यातील एरंडोल इथं कारवाई करून १५०० किलो गांजा जप्त केला आहे. हा गांजा आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून आणला गेला होता. या प्रकरणी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. याशिवाय, नांदेड जिल्ह्यात एनसीबीच्या पथकानं धडक कारवाई करत ११०० किलो गांजा जप्त केला आहे. यात एका ट्रकमधून गांजाची पोती जप्त करण्यात आली आहेत. दोघा संशयित तस्करांना देखील ताब्यात घेण्यात आलं आहे. समीर वानखेडे यांनीच या कारवाईबद्दल माहिती दिली आहे.
या घटनांच्या पार्श्वभूमीवर क्रांती रेडकर हिनं ट्वीट केलं आहे. 'ना रुकेंगे, ना थमेंगे...' असं तिनं ट्वीटमध्ये म्हटलं आहे. समीर वानखेडे यांच्यावर आरोप करणाऱ्या नवाब मलिक यांना व त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना हा टोला असल्याचं मानलं जात आहे.
Na rukenge na thamengey.. 🙏🙏🙏 pic.twitter.com/jxChB5OZvE
— Kranti Redkar Wankhede (@KrantiRedkar) November 15, 2021
No comments:
Post a Comment