मुंबई, दि.२३ :- राज्यातील मत्स्यव्यवसायिकांना देण्यात येणारा मत्स्य विक्री परवाना, डिझेल विक्री परतावा रक्कम,वरळी कोळीवाडा येथील कोळी बांधवांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार असल्याची ग्वाही पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
मंत्रालयातील दालनात राज्यातील मच्छिमार बांधवांच्या अडचणीसंदर्भात आयोजित बैठकीत मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. यावेळी या बैठकीला उपसचिव श्रीनिवास शास्त्री,मत्स्यव्यवसाय सहआयुक्त रा.ग.जाधव, मत्स्यव्यवसाय सहआयुक्त (सागरी) सं. गो. दप्तरदार, मच्छीमार संघटनेचे डॉ.रूपेश कोळी,मुंबईच्या मच्छिमार सेलचे प्रदीप टपके,मंगेश कोळी, बिपीनचंद्र पाटील, आखिल भारतीय कोळी संघटनेच्या श्रीमती मालिनी वरळीकर, मच्छिमार सेल पेण तालुका अध्यक्ष मोनिका गोटेकर यावेळी उपस्थित होते.
मत्स्यव्यवसाय राज्य मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले,सागरी महामार्ग जिथे होत आहे त्या ठिकाणी असणा-या कोळी बांधवाच्या अनेक मागण्या आहेत त्याबाबत तोडगा काढण्यासाठी संबधित विभागाच्या कार्यान्वयीन यंत्रणासोबत बैठकीचे आयोजन करून त्यासंदर्भात मत्स्यव्यवसायिकांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल.तसेच डिझेल विक्री परताव्याची रक्कम विहित वेळेत वितरण करणे, मत्स्यव्यवसायिकांना मासे विकण्यासाठी परवाने देण्यासंदर्भातही कार्यवाही करण्याची ग्वाही यावेळी मत्स्यव्यवसाय राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या बैठकीत दिली.
यावेळी मच्छीमार संघटनेचे डॉ.रूपेश कोळी, मुंबईच्या मच्छिमार सेलचे प्रदीप टपके, मंगेश कोळी, बिपीनचंद्र पाटील,आखिल भारतीय कोळी संघटनेच्या श्रीमती मालिनी वरळीकर,मच्छिमार सेल पेण तालुका अध्यक्ष मोनिका गोटेकर यांनी राज्यातील मत्स्यव्यवसायिकांचे प्रश्न बैठकीत मांडले.
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3xjBu2i
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment