पुणे म्हाडाच्या ४२२२ घरांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकृतीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ - latur saptrang

Breaking

Tuesday, November 16, 2021

पुणे म्हाडाच्या ४२२२ घरांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकृतीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई, दि. 16 :- पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ अर्थात, पुणे म्हाडाच्या 4 हजार 222 घरांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकृतीचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात झालेल्या या कार्यक्रमास गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी नितीन माने आदी मान्यवर उपस्थित होते.

पुणे म्हाडाच्या माध्यमातून पुणे, सांगली, सोलापूर जिल्ह्यातल्या 4 हजार 222 घरांच्या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीस आजपासून सुरुवात झाली. जानेवारी 2022 च्या पहिल्या आठवड्यात ही सोडत निघणार आहे. पुणे म्हाडाची ‘जानेवारी 2022-ऑनलाईन सोडत’ योजना राज्यातल्या अनेक गरजूंचं, पुण्यासारख्या शहरात स्वस्त घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करणार आहे.

0000000000



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/31VWekO
https://ift.tt/3Cs6UVa

No comments:

Post a Comment