मुंबई, दि. 1 : अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या दिवाळीत सर्वांना सकस आणि भेसळमुक्त अन्नपदार्थ मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग सजगपणे कार्यरत असल्याचे त्यांनी आपल्या शुभसंदेशात म्हटले आहे.
डॉ.शिंगणे आपल्या संदेशात पुढे म्हणतात, सणासुदीच्या काळात दूध व दुग्धजन्य पदार्थ, तेल, तुप यासारखे पदार्थ निर्भेळ असावेत यासाठी प्रशासनामार्फत काळजी घेतली जाते आहे. ग्राहकांनी देखील मिठाई आणि इतर खाद्य पदार्थ विकत घेत असतांना त्यावरील उत्पादन दिनांक आणि संपण्याचा (एक्स्पायरी) दिनांक बघुनच खरेदी करावी. या दिवाळीत आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेत दिवाळी आनंदाने साजरी करावी.
सर्व जनतेला दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा देत असताना यंदाच्या दिवाळीत कोरोनाचे सावट दूर व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. हात धुणे, मास्क लावणे याचा विसर पडू नये आणि प्रत्येकाने जबाबदारीने सण साजरा करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
००००
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3pSNrKw
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment