सर्व शाळांमध्ये २३ ते २६ नोव्हेंबर दरम्यान “माझे संविधान, माझा अभिमान” उपक्रम - latur saptrang

Breaking

Thursday, November 25, 2021

सर्व शाळांमध्ये २३ ते २६ नोव्हेंबर दरम्यान “माझे संविधान, माझा अभिमान” उपक्रम

मुंबई, दि. 24 : संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय संविधानाविषयी जाणीवजागृती आणि भारतीय संविधानातील मूलतत्त्वांचा विद्यार्थ्यांनी जबाबदार, सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक होण्यासाठी आपल्या जीवनात अंगीकार करुन त्याद्वारे संविधानाचा योग्य सन्मान करण्याकरीता शालेय शिक्षण विभागाच्या वतीने दि. २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर, २०२१ या कालावधीत “माझे संविधान, माझा अभिमान’ उपक्रम राबविण्यात येत आहे.

भारतीय राज्यघटनेतील मूलतत्त्वांची व्याप्ती आणि सर्वसमावेशकता सर्व विद्यार्थ्यांना समजावी तसेच घटनेतील मूलतत्त्वे विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली जावीत यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे. हा या उपक्रमाचा उद्देश आहे. असे परिपत्रक शिक्षण संचालक (प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक) यांनी काढले आहे.

00000



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3oWsyMu
https://ift.tt/eA8V8J

No comments:

Post a Comment