कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय हे आंदोलनाचे यश – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया - latur saptrang

Breaking

Friday, November 19, 2021

कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय हे आंदोलनाचे यश – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया

मुंबई, दि. १९ – कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय हे आंदोलनाचे यश असल्याची प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणतात, तीन केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात जवळपास वर्षभरापासून शेतकरी वर्ग दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत होता. अखेर माननीय पंतप्रधानांनी हे‌ कायदे‌ मागे घेतल्याची घोषणा केली. स्वातंत्र्योत्तर काळात सर्वात जास्त काळ चाललेल्या या आंदोलनाचे हे यश म्हणावे लागेल.‌ या आंदोलनात आजपर्यंत मृत्युमुखी पडलेल्या‌ सर्व शेतकऱ्यांना यानिमित्ताने आदरांजली व्यक्त करतो.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3x0iGok
https://ift.tt/eA8V8J

No comments:

Post a Comment