मुंबई, दि. २ : इमारत व इतर बांधकामांवर काम करणाऱ्या बांधकाम कामगारांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी, नूतनीकरण व लाभ वाटपांबाबतचे अर्ज तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाला दिले.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांना देण्यात येत असलेल्या ऑनलाईन सुविधांची आढावा बैठक घेतली, तेव्हा सदर निर्देश कामगार विभागाला देण्यात आले.
मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिलेल्या निर्देशानंतर कामगार विभागातील सर्व विभागीय कार्यालये व जिल्हा कार्यालयात दिनांक 28 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीत शिबीरांचे आयोजन करून मोठ्या प्रमाणावर प्रलंबित अर्ज निकाली काढण्यात आले. या चार दिवसात 55 हजार बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आली तर एक हजार 200 कामगारांचे नूतनीकरण करण्यात आले. यापैकी 8 हजार 825 लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करून त्यांना 7 कोटी 34 लाख 21 हजार 832 रूपये वाटप करण्यात आले आहे.
000
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3EDbt0d
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment