मुंबई, दि. ९ : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते साप्ताहिक विवेकच्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन मंगळवारी (दि. 9) राजभवन येथे संपन्न झाले.
कार्यक्रमाला हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार रमेश पतंगे, बडवे उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संस्थापक श्रीकांत बडवे, उद्योजक अनुप सुर्वे, श्रीनिवास लक्ष्मण तसेच अंकामध्ये सहभागी लेखक उपस्थित होते.
साप्ताहिक विवेक राष्ट्रभक्तीपर विचारांच्या प्रचार – प्रसारासोबत विविध सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक विचारांवर समाजाचे प्रबोधन करीत असल्याबद्दल राज्यपालांनी ‘विवेक’ परिवाराचे अभिनंदन केले.
भारत सुखी, समृद्ध व सशक्त राष्ट्र होऊन गतिमान भारत व आत्मनिर्भर भारत या संकल्पना साकार करण्यासाठी प्रयत्न सुरु असून ‘विवेक’ विचारांनी राष्ट्र निर्माण कार्याला गती मिळेल असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.
०००

Governor Koshyari releases Diwali issue of Weekly ‘Vivek’
Mumbai Dated 9 : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari released the Diwali issue of weekly ‘Vivek’ ‘Deepawali Visheshank’ at Raj Bhavan, Mumbai on Tuesday (9 Nov).
Chairman of Hindustan Prakashan Sanstha and senior journalist Ramesh Patange, Managing Director of the Badwe Group Shrikant Badwe, entrepreneur Anup Surve, writer and journalist Srinivasa Laxman and contributing writers were present.
000
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3H4OSMc
https://ift.tt/3mWuUuQ
No comments:
Post a Comment