मुंबई दि. 15 : थोर इतिहासकार, पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने महाराष्ट्राचे व्रतस्थ आणि ऋषीतुल्य व्यक्तिमत्व हरपले आहे. छत्रपती शिवरायांच्या जाज्ज्वल्य इतिहासाचे स्फुल्लिंग महाराष्ट्राच्या घराघरात नेणाऱ्या राष्ट्रभक्तीची ज्योत मनामनात चेतवणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने महाराष्ट्राची कधीही भरून न निघणारी सांस्कृतिक हानी झाली आहे. “बाबासाहेब पुरंदरे यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो.” अशा शब्दांत गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
000
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3cjT8Jf
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment