आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात मोठ्या घडामोडी; SIT मुंबईत दाखल, आता... - latur saptrang

Breaking

Saturday, November 6, 2021

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात मोठ्या घडामोडी; SIT मुंबईत दाखल, आता...



 मुंबई: आर्यन खान ड्रग्ज प्रकरण व अन्य पाच प्रकरणांचा तपास करण्यासाठी एनसीबी महासंचालकांनी दिल्ली मुख्यालयातील अधिकाऱ्यांचं विशेष तपास पथक (एसआयटी) नेमलं असून हे पथक आज मुंबईत दाखल झालं आहे. एसआयटी आजच संबंधित सर्व प्रकरणांचा तपास आपल्या हाती घेणार आहे. ( Aryan Khan Case Latest Update )



कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर एनसीबी मुंबई युनिटच्या टीमने छापा टाकला होता. या कारवाईत अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. ही कारवाई अनेक कारणांनी देशभर गाजत आहे. यात खंडणीवसुलीचा दावा करण्यात आला असून मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर थेट आरोप केले आहेत. या आरोपांची आधीच एनसीबीने चौकशी सुरू केली आहे. ही सगळी पार्श्वभूमी असताना शुक्रवारी एनसीबी महासंचालकांनी मोठा निर्णय घेत आर्यन खान ड्रग्ज प्रकरण व अन्य पाच प्रकरणांचा तपास करण्यासाठी एनसीबीचे उपमहासंचालक संजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी नेमली. ही एसआयटी आता या सर्व प्रकरणांचा तपास करणार आहे. त्यात समीर वानखेडे आणि त्यांची टीम साह्य करेल, असे नमूद करण्यात आले आहे.

महासंचालकांच्या निर्देशानंतर संजय सिंह व त्यांची टीम आज लगेचच मुंबईत दाखल झाली आहे. ही टीम संबंधित सर्व प्रकरणांचा तपास आजच हाती घेणार असल्याचे सांगण्यात आले. एनसीबी मुंबई कार्यालयातून वानखेडे व टीमकडून एसआयटी संबंधित सर्व कागदपत्रे ताब्यात घेणार असून काही प्रकरणांत गरज भासल्यास जबाब नव्याने नोंदवले जाण्याचीही शक्यता आहे.

दरम्यान, आर्यन खान क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण, नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्याशी संबंधित प्रकरण, अलीकडेच ड्रग्ज प्रकरणात अभिनेता अरमान कोहली याला अटक झाली होती ते प्रकरण तसेच अन्य तीन गुन्ह्यांचा तपास एसआयटी करणार आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोविड विभागाला आग; १० जणांचा मृत्यू,१ जण अत्यवस्थ
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीची दुर्घटना दुर्दैवी आणि वेदनादायक – उपमुख्यमंत्री अजित पवार

No comments:

Post a Comment