लातुर :- ( प्रतिनिधि )आज सर्वसामान्य जनतेची वाहिनी म्हणजेच ST आपली लालपरी खूप मोठ्या संकटात आहे. आज रोजी सर्व ST कर्मचाऱ्यांची खूप दयनीय अवस्था पाहायला मिळत आहे. यामध्ये ज्या ST कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या परिवारास आणि आंदोलन करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मिळायला पाहिजे व त्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या पाहिजे. हा लढा फक्त सर्वसामान्य ST कर्मचाऱ्याचा आणि त्यांच्या कष्टाचा आहे. त्यामुळे राज्य शासनाने यामध्ये तातडीने दखल घेऊन सर्व कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवावे. संपूर्ण वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन संघटनेकडून आंदोलन करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना जाहीर पाठिंबा म्हणून संघटनेचे अध्यक्ष मराठा प्रवीण पिसाळ आणि कार्याध्यक्ष अवधूत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनामध्ये हे निवेदन पत्र दिले गेले. यावेळी उपस्थित सर्व वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन लातूर जिल्ह्यातील समन्वयक राहुल जाधव, महेश भोसले, विशाल काळे, गंगाधर पवार, अण्णा सोमवंशी, सुशील पाटील, उमेश देशमुख, सोमेश शिंदे, संतोष रोंगे, प्रमोद निपाणीकर, वैभव चव्हाण.
Sunday, November 14, 2021
Home
Unlabelled
वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचा आंदोलन करणाऱ्या ST कर्मचाऱ्यांना जाहीर पाठिंबा.
वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचा आंदोलन करणाऱ्या ST कर्मचाऱ्यांना जाहीर पाठिंबा.
About www.latursaptrangnews.com
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment