मुंबई, : राज्यात कोविड १९ आणि ओमायक्रोनचा प्रसार होऊ नये यासाठी सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून आता लग्न समारंभ, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांसाठी उपस्थित राहणाऱ्यांची मर्यादा ५० केली आहे. तर अंतिम संस्कारासाठी केवळ २० लोकांना मुभा देण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या वतीने जारी केलेल्या परिपत्रकात सदर माहिती देण्यात आली आहे. यात कोविड १९ आणि ओमायक्रोनचा पाश्वभूमीवर खुल्या दालनात संपन्न होणाऱ्या लग्न समारंभांसाठी उपस्थितांची मर्यादा १०० वरून ५० करण्यात आल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे दालनात किंवा खुल्या जागेत होणाऱ्या धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक किंवा राजकीय कार्यक्रमांसाठी ही सदर मर्यादा ५० करण्यात आली आहे. हे निर्बंध ३१ डिसेंबर २०२१ च्या रात्री १२ वाजल्यापासून अंमलात येणार आहेत.
यापुढे परिपत्रकात अंतिम संस्कारासाठी उपस्थितांची मर्यादा आता अधिकतम २० करण्यात आल्याचे संगितले आहे. त्याचप्रमाणे राज्यातील पर्यटक स्थळांवर, समुद्रकिनारपट्टी, क्रिडांगणे यासारख्या जास्त लोकांना आकृष्ट करणाऱ्या ठिकाणी सक्षम प्राधिकरणास २४ डिसेंबरच्या आदेशानुसार लागू केलेले सर्व निर्बंधांव्यतिरिक्त आवश्यक वाटल्यास (जमावबंदी) १४४ सीआरपीसी लागू करता येईल. याशिवाय आदींच्या आदेशाप्रमाणे लागू सर्व निर्बंध पुढील आदेशापर्यंत अंमलात राहणार आहेत.
No comments:
Post a Comment