भारतासह संपूर्ण जगात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. ओमिक्रॉन या कोरोनाच्या नवीन स्ट्रेनच्या आगमनानंतर नवीन रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तज्ञ सहमत आहेत की ओमिक्रॉनची लक्षणे गंभीर नाहीत. ताप, खोकला, थकवा, डोकेदुखी आणि अंगदुखी यांसारखी त्याची लक्षणे आधीपासून अस्तित्वात असलेल्या स्ट्रेनसारखीच समान असल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोना विषाणूचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे ताप. याला कोरोनाचे क्लासिक लक्षण देखील म्हटले जाते. तथापि, कोरोना ताप हा सामान्य तापापेक्षा थोडा वेगळा असतो. सध्या थंडीचा काळ असून या ऋतूमध्ये सामान्य फ्लूचाही धोका अधिक असतो. यामुळेच तुम्हाला फ्लू आणि कोरोना ताप यातील फरक समजून घेणं आवश्यक आहे.
करोनाचा ताप व सामान्य तापात काय फरक आहे?
ज्या लोकांना फ्लू आहे त्यांना सामान्यतः 1 ते 4 दिवसात लक्षणे जाणवू शकतात तर कोरोना व्हायरसची लक्षणे 1 ते 14 दिवसांच्या दरम्यान विकसित होऊ शकतात. पण कोरोनाचा इन्क्यूबेशन कालावधी 5.1 दिवस आहे. त्या तुलनेत फ्लूमध्ये इनक्यूबेशन कालावधी 1 ते 3 दिवसांचा असतो. इनक्यूबेशन पीरियड म्हणजे रूग्नामध्ये लक्षणे विकसित झालेल्या दिवसांची संख्या. कोरोना असलेल्या रुग्णाला 100.4 °F (38 °C) किंवा त्याहून अधिक ताप असू शकतो. अशा परिस्थितीत त्यांनी घरीच राहून वैद्यकीय सल्ला घ्यावा. तसेच सामान्य तापात वास आणि चव कमी होणे यासारखी लक्षणे दिसून येत नाहीत पण कोरोनाच्या बाबतीत रूग्णाची वास आणि चव घेण्याची क्षमता गमावते. बहुतेक रुग्ण साधारण तापातून दोन आठवड्यांत बरे होतात. पण कोरोनामुळे रुग्णाच्या नसा, फुफ्फुस, हृदय, पाय किंवा मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात किंवा मुलांना मल्टीसिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम होऊ शकतो. श्वास घेण्यास त्रास होणे व धाप लागणे ही कोरोनाची एक सामान्य समस्या आहे, परंतु फ्लूच्या बाबतीत असे काहीही होत नाही. कोरोनाच्या रूग्णांना तापासह डोकेदुखी असेलच असे नाही, पण हे फ्लूचे सर्वात मोठे लक्षण आहे. खूप थकवा किंवा मळमळ होणे हे कोरोनामध्ये जास्त असते तर साधारण फ्लूमध्ये ते कमी असते.
आराम करा
कोणतीही शारीरिक क्रिया किंवा फिजिकल अॅक्टिविटी आपल्या शरीराचे तापमान वाढवू शकते. त्यामुळे ताप आल्यावर विश्रांती घ्यावी. तुम्हाला 102°F (38.9°C) किंवा त्याहून अधिक ताप असल्यास, तुम्ही विश्रांतीसह भरपूर द्रव पदार्थ प्यावे. औषधांची नेहमीच गरज नसते. पुरेशी झोप घेतल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होऊ शकते. जर तुम्हाला तापात गंभीर डोकेदुखी, मानेमध्ये प्रचंड वेदना, धाप लागणे किंवा इतर असामान्य लक्षणे असल्यास लगेच तुमच्या डॉक्टरांना संपर्क करा.
द्रव पदार्थ अधिक घ्या
तापामुळे शरीरात पाण्याची कमतरता (dehydration) होऊ शकते, ज्यामुळे डिहायड्रेशनची समस्या देखील होऊ शकते. फ्लू, व्हायरल किंवा कोरोना यांसारख्या कोणत्याही प्रकारच्या तापाच्या बाबतीत भरपूर द्रव पिण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी पाणी, चहा, नारळपाणी, सूप, ज्यूस इत्यादींचे सेवन करावे.
हलके-फुलके कपडे घाला
ताप आल्यावर लोक जास्त कपडे घालतात असे अनेकदा दिसून येते. यामुळे तुमचा ताप आणखी वाढू शकतो. ताप कमी करण्यासाठी हलके-फुलके कपडे घालावेत. खूप गरम कपडे शरीराचे तापमान वाढवू शकतात यावर तज्ञ देखील सहमत आहेत.
थंड पाण्याचा शेक घ्या
थंड पाण्याच्या शेकमुळे शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते. यासाठी एका भांड्यात थंड पाणी घेऊन त्यात स्वच्छ व मऊ सुती कापड भिजवून रुग्णाच्या कपाळावर, मनगटावर आणि घशावर लावा. उर्वरित शरीर झाकून ठेवा. जर ताप 103 अंशांपेक्षा जास्त असेल तर गरम पाण्याने शेकवणं टाळा. बरेच लोक गरम पाण्याचा शेक देखील घेतात.
कोमट पाण्याने अंघोळ करा
ताप आल्यावर अनेकांना थंड पाण्याने आंघोळ करायला आवडते. ही चांगली गोष्ट नाही. यामुळे तुमचं अंग थरथरू शकतं, ज्यामुळे तुमच्या शरीराचे तापमान आणखी वाढू शकते. त्याऐवजी, शरीर थंड होण्यासाठी कोमट पाण्याने अंघोळ करा. कोमट पाण्याने अंघोळ केल्याने थकलेल्या स्नायूंना आराम मिळण्यास आणि शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते.
कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या करा
कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने घसा खवखवणे कमी होण्यास मदत होते. तसेच घशात जमा झालेले बॅक्टेरिया देखील बाहेर येऊ शकतात. त्यासाठी १ ग्लास कोमट पाण्यात १/४ टीस्पून मीठ आणि १/४ टीस्पून बेकिंग सोडा मिसळून गार्गल करा. आपण गुळण्या करण्यासाठी पाण्यात अॅपल सायडर व्हिनेगर किंवा मध देखील घालू शकता.
डोक्याखाली 2 उशा घ्या
आपले डोके उंचावर ठेवल्याने नाकाचा त्रास कमी होण्यास मदत होते. लक्षात ठेवा की उशी मऊ असावी जेणेकरून तुमच्या मानेवर जास्त दाब पडणार नाही. जास्त वेळ उंच उशीवर झोपणे टाळावे.
संक्रमनाशी लढणारे पदार्थ खा
तापामुळे तोंडाची चव खराब होऊ शकते, पण खाणे-पिणे बंद करू नका. या काळात तुम्ही काही पदार्थांचे सेवन केले पाहिजे जे संसर्गाशी लढण्यास मदत करतात. तुम्ही केळी, तांदूळ, व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ जसे की ब्लूबेरी, गाजर (ज्यामध्ये बीटा-कॅरोटीन असते), काळीमिरी यांचा समावेश आहारात करू शकता, जे सायनसचा त्रास कमी करू शकतात आणि फुफ्फुसातील कफ काढून टाकण्यास मदत करतात, क्रॅनबेरी, ब्लॅक अॅंड ग्रीन टी इत्यादी समाविष्ट करा.
टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment