देवेंद्र फडवणीस यांना मोहसीन खान चे प्रतिउत्तर! 'आयत्या पिठावर रेघोट्या मारून मलिदा लाटणार्‍याना टिपू सुलतान कळणार नाही'- मोहसीन खान - latur saptrang

Breaking

Friday, January 28, 2022

देवेंद्र फडवणीस यांना मोहसीन खान चे प्रतिउत्तर! 'आयत्या पिठावर रेघोट्या मारून मलिदा लाटणार्‍याना टिपू सुलतान कळणार नाही'- मोहसीन खान

 देवेंद्र फडवणीस यांना मोहसीन खान चे प्रतिउत्तर! 'आयत्या पिठावर रेघोट्या मारून मलिदा लाटणार्‍याना टिपू सुलतान कळणार नाही'- मोहसीन खान

इंग्रजांची गुलामी करणाऱ्यांना आणि गुलामगिरीतून तल्लीन झालेल्या लोकांची मानसिकता ही कीळसावणारी आहे त्यामुळेच टिपू सुलतान यांचा द्वेष आणि क्लेश करण्याचं काम भाजपाचे नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केले आहे, ज्या टिपू सुलताननि आपलं सर्वस्व पणाला लावून राज्याचा नव्हे तर संपूर्ण देशाला वाचविण्यासाठी आपले बलिदान दिले, आहुती दिली त्यांच्याबद्दल अपशब्द वापरून जातीय तेढ निर्माण करण्याचं काम देवेंद्र फडवणीस करीत आहेत मुस्लिमेतर बहुतांश हिंदू हे टिपू सुलतान ला चाहणारे आहेत त्यांच्या बलिदानाचा कौतुक करून त्यांच्या विचारधारेला घेऊन चालणारे आहेत, हे त्यांना दिसणार नाही आयत्या पिठावर रेघोट्या मारून सत्तेचा मलिदा लाटणाऱ्यांना टिपू सुलतान चे महत्व समजणार नाही श्रीरंगपट्टनम च्या मंदिरा वर झालेल्या हल्ल्यात मंदिर उभे करण्याचे काम या टिपू सुलतान यांनीच केले होते, राज्याला इंग्रजांपासून वाचवण्यासाठी आपल्या लहान मुलांना तहा पोटी पोटी इंग्रजांकडे ठेवावे लागले त्या शूर योद्धा चा अपमान म्हणजे हा देशाचा अपमान आहे, ज्यांनी माफीनामे लिहून इंग्रजांची चाकरी केली त्यांना टिपू सुलतानचे महत्व कळणार नाही, बरेच हिंदू टिपू सुलतान ला राहणारे आहेत त्यांनी टिपू सुलतान बद्दल अपशब्द कधीही वापरलेला नाही त्यांनी त्याचा कधी द्वेष केला नाही व्याख्याने प्रबोधनी आधी देऊन भरभरुन कौतुक केलं अशा हिंदूंचाही अपमान देवेंद्र फडवणीस यांनी केलेला आहे याचा तीव्र निषेध मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन करीत आहे.




No comments:

Post a Comment