देशात ८ दिवसात कोरोना रुग्णवाढीचा वेग सुसाट; २ लाख ७१ हजार २०२ बाधितांची नव्याने भर - latur saptrang

Breaking

Sunday, January 16, 2022

देशात ८ दिवसात कोरोना रुग्णवाढीचा वेग सुसाट; २ लाख ७१ हजार २०२ बाधितांची नव्याने भर



नवी दिल्ली;

देशात कोरोना रुग्णवाढीचा मागील ८ दिवसात कमालीचा वाढला आहे. देशातील आकडेवारीचा विचार करता तिसरी लाट आल्याच्या सदृश्य परिस्थिती आहे. देशात काल (ता. १५) २ लाख ७१ हजार २०२ बाधितांची भर पडली आहे, तर ३१४ जणांचा कोरोनाने बळी गेला.१ लाख ३८ हजार ३३१ जणांनी कोरोनावर विजय मिळवला. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी (ता.१५) २ हजार ३६९ अधिक कोरोना केसेस वाढल्या आहेत.

देशात १५ लाख ५० हजार ३७७ ॲक्टिव्ह केसेस आहेत. देशात ८ जानेवारीपासून १२ लाखांहून अधिक कोरोनाग्रस्त झाले आहेत. त्यामुळे देशाच्या दैनंदिन कोरोना संसर्ग दरात दोन टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सद्यस्थितीत कोरोना संसर्ग दर १६.२८ टक्क्यांवर पोहोचला आहे.



No comments:

Post a Comment